मुंबई : दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा २५७ धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून विराट कोहली ठरला आहे. विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनीला मागे टाकत सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार ठरण्याचा मान पटकावला आहे.


वेस्ट इंडिजवर टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमैका कसोटी सामन्यापूर्वी कोहलीने २७ वा विजय मिळवला होता. मात्र, या विजयासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये २८ विजय मिळविले. ३० वर्षीय कसोटी कर्णधार म्हणून ४८ सामन्यांत २८ विजय मिळवले असून महेंद्रसिंग धोनीने ६० सामन्यांत २७ विजय मिळवले आहेत. धोनीचा विक्रम विराट कोहलीने मोडला असून तो यशस्वी कर्णधार म्हणून पुढे आला आहे.


पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ३१८ धावांचा मोठा विजय नोंदविला होता आणि दुसऱ्या कसोटीतही मोठा विजय मिळवत तो परदेशी दौऱ्यात कसोटीतील सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार ठरला आहे. माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मागे कोहली मागे होता. हा कोहलीचा परदेशातील १२ वा कसोटी विजय होता. परदेशी भूमीवर कर्णधार म्हणून त्याने २६ सामन्यात विक्रम मोडला. गांगुलीने २८ सामन्यांत ११ कसोटी विजय मिळविला होता.


दुसर्‍या कसोटीतील या विजयामुळे भारताने दोन सामन्यांची मालिका २-०ने जिंकली. त्यामुळे १२० गुणांसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अव्वल स्थानावर भारत गेला आहे. हा विजय भारताचा विंडीजवर सलग आठवा मालिका विजय होता.