सचिननंतर हा मान मिळालेला विराट होता दुसरा भारतीय
भारताचा कर्णधार विराट कोहली नव नव्या रेकॉर्डसला गवसणी घालत आहे. सध्या विराट हा क्रिकेट विश्वात सर्वात चर्चेत असलेला क्रिकेटर आहे. सचिन नंतर विराटच मोठे मोठे रेकॉर्ड मोडेल अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. २०१७ हे वर्ष विराटसाठी खूप चांगलं ठरलं.
मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली नव नव्या रेकॉर्डसला गवसणी घालत आहे. सध्या विराट हा क्रिकेट विश्वात सर्वात चर्चेत असलेला क्रिकेटर आहे. सचिन नंतर विराटच मोठे मोठे रेकॉर्ड मोडेल अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. २०१७ हे वर्ष विराटसाठी खूप चांगलं ठरलं.
क्रिकेटचं बायबल
'विस्डेन' ज्याला क्रिकेटचा बायबल म्हणतात, त्याने या वर्षी त्याच्या मुखपृष्ठावर विराट कोहलीचा फोटो प्रदर्शित केला होता. याआधी, वर्ष 2014 मध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा फोटो या पुस्तकच्या मुखपृष्ठावर छापला गेला होता.
क्रिकेटरसाठी असतं स्वप्न
विस्डेन मॅगझीनच्या कव्हर पेजवर जागा मिळवणे हे कोणत्याही क्रिकेटरसाठी स्वप्न असतं. या मासिकाच्या कव्हर पेजवर रिवर्स स्वीप खेळतांनाचा विराटचा फोटो छापण्यात आला होता. डिसेंबर २०१६ मध्ये कोहलीने इंग्लंड विरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये २ टेस्टमध्ये २ शतकं झळकावली होती. २३५ धावांचा मुंबईतील चौथ्या कसोटीत केलेल्या २३५ धावांचा रेकॉर्ड देखील त्याच्या करिअरमध्ये समाविष्ट झाला होता. यामुळे त्याचं नाव या मॅगझिनवर छापलं गेलं होतं. २०१७ मध्ये देखील विराटने चांगली कामगिरी करुन दाखवली आहे.
विराटचं कौतूक
विस्डेनचे संपादक लॉरियस बूथ यांनी विराटचं कौतुक करत म्हटलं होतं की, अलिकडच्या वर्षांत या भारतीय कर्णधाराने क्रिकेटमध्ये क्रांतिकारी बदल आणला आहे. विस्डेनच्या कव्हर पेजवर जागा मिळालेल्या कॅप्टन कोहली हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय होता. याआधी 2014 मध्ये सचिन तेंडुलकरचा फोटो विस्डेनच्या मुखपृष्ठावर प्रकाशित झाला होता. २०१८ मध्ये आता कोणाचा फोटो या मॅगझिनवर येतो हे पाहावं लागणार आहे.