Ravi Shastri on Kohli  : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रणजी खेळण्याचा सल्ला दिला आहे. शास्त्री आणि कोहली जोडगोळी विराट कर्णधार असताना आपण पाहिली आहे. अनिल कुंबळे संघाचे कोच झाल्यावर त्यावेळी कोहलीला शास्त्रीच पुन्हा कोच म्हणून हवे असल्याच्या चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू होत्या. अशातच शास्त्री यांनी कोहलीला रणजी क्रिकेट (Ranji Cricket) खेळण्याचा सल्ला दिल्याने याची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे. (Virat Kohli play Ranji cricket advises Ravi Shastri latest marathi Sport News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे कोहलीने न्यूझीलंडविरूद्धचा तिसरा सामना न खेळता दिल्ली आणि हैदराबादमधील रणजी सामना खेळायला हवा असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यावेळी कॉमेंट्री करताना ते बोलत होते.


मला पहिल्यापासून वाटतं की तुम्हाला जर भारतात जास्त सामने खेळायचे असतील तर तुम्ही प्रथम श्रेणीतील सामने खेळले पाहिजेत. टीम इंडियामधील अनेक खेळाडू जास्त प्रथम श्रेणी खेळत नसल्याची खंत बोलून दाखवत रेड बॉल क्रिकेटचा कोहलीला सराव म्हणून तरी त्याने रणजी सामना खेळायला हवा, असं शास्त्री म्हणाले.


भारत आणि न्यूझीलंडमधील तिसरा एकदिवसीय सामना 24 जानेवारीला इंदूर येथे होणार आहे. याच दिवशी रणजीमध्ये हैदराबाद आणि दिल्लीमधील सामना सुरू होणार आहे. कोहलीने आताच पार पडलेल्या श्रीलंकेच्या एकदिवसीय मालिकेमध्ये सलग दोन शतके केली आहेत. कोहलीने T20 सह एकदिवसीय क्रिकेटमध्ये फॉर्म मिळवला पण कसोटीमध्ये कोहलीची बॅट काही चाललेली दिसली नाही, बांगलादेशविरूद्धची सीरीज भारताने जिंकली होती  मात्र त्यामध्ये कोहलीने अवघ्या 45 धावा केल्या होत्या. 


दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीचा फॉर्म भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे रवी शास्त्री यांनी दिलेला सल्ला कोहली ऐकणार की नाही? याच्यावर अवघ्या क्रीडा विश्वाचं लक्ष लागलं आहे.