मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि अंबाती रायडूनं शानदार शतक केलं. रोहितचं हे वनडेमधलं २१वं तर अंबाती रायडूचं तिसरं शतक होतं. रोहितनं १३७ बॉलमध्ये १६२ रनची खेळी केली. यामध्ये २० फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. रायुडूनं ८१ बॉलमध्ये १०० रन केले. यामध्ये ८ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित आणि रायुडूनं शतक केलं असलं तरी पहिल्या तिन्ही वनडेमध्ये शतक करणारा विराट कोहली या मॅचमध्ये स्वस्तात आऊट झाला. विराटनं १७ बॉलमध्ये १६ रन केले. कमी रनवर आऊट झाल्यानंतरही विराटनं एक नकोसं रेकॉर्ड त्याच्या नावावर केलं. १६ रन हा विराट कोहलीचा २०१८ या वर्षातला वनडेमधला सर्वात कमी स्कोअर आहे.


यावर्षामध्ये विराटनं आत्तापर्यंत १३ वनडे खेळल्या आहेत. यामध्ये त्याचा स्कोअर ११२, ४६, १६०, ७५, ३६, १२९, ७५, ४५, ७१, १४०, १५७, १०७, १६ आहे. विराटनं या मॅचमध्येही शतक केलं असतं तर वनडे क्रिकेटमध्ये लागोपाठ ४ शतकं करणारा तो दुसरा खेळाडू ठरला असता. याआधी फक्त श्रीलंकेच्या कुमार संगकारानं लागोपाठ ४ वनडेमध्ये ४ शतकं केली आहेत.