नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एका व्हिडिओच्या माध्यमातून दिल्लीत वाढत्या प्रदुषणाला आवर घालण्याचं आवाहन केलंय. प्रदूषणाविरूद्धची मॅच जिंकण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल, असं विराट व्हिडिओच्या माध्यमातून म्हणाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली याने सोशल मीडिया हॅन्डलवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत विराटने दिल्लीकरांना आवाहन केलंय की, त्यांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा जेणेकरून प्रदूषणाला आळा घालता येईल. त्याने हा व्हिडिओ ‘मुझे फर्क पडता है’ हा हॅशटॅग वापरून केलाय. 


कोहली व्हिडिओत म्हणाला की, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की, दिल्लीत प्रदूषणाची स्थिती काय आहे. मला तुम्हा सर्वांना सांगायचंय की, आपण सगळे प्रदूषणाबाबत बोलत आहोत, त्यावर वाद घालत आहोत. पण कुणी याच्याशी दोन हात करण्याचा विचार केलाय? आपल्या प्रदूषणाविरूद्धची मॅच जिंकायची असेल तर सर्वांना एकत्र यावं लागेल. कारण प्रदूषण कमी करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.



तो म्हणाला, मी लोकांना आवाहन करतो की, जास्तीत जास्त लोकांनी कार शेअरिंग करा. त्यासोबतच सार्वजनिक वाहनांचा वापर करा.