मेलबर्न : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा झिरो हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. पण अनुष्काचा नवरा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनं या चित्रपटातल्या अनुष्का शर्माच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. याबद्दलचं एक ट्विट त्यानं केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिरो हा चित्रपट बघितला. चित्रपटातलं इंटरटेनमेंट आवडलं आणि मी चित्रपटही एन्जॉय केला. प्रत्येकानं चांगलं काम केलं आहे. पण अनुष्का शर्माचा अभिनय आवडला कारण तो जास्त आव्हानात्मक होता. अनुष्काचं काम उत्कृष्ट आहे, असं ट्विट विराटनं केलं आहे. विराट कोहलीच्या या ट्विटनंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.








या चित्रपटात शाहरुख खान आणि कतरिना कैफ असतानाही विराट कोहलीनं फक्त अनुष्का शर्माचंच नाव का घेतलं? त्याच्यावर अनुष्कानं ट्विट करण्यासाठी दबाव टाकला का? असे सवालही अनेक यूजर्सनी विचारले आहेत.