नवी दिल्ली : काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं 13 दशहतवाद्यांना कंठस्नाऩ घातल्यावर त्याविषयी पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद अफ्रिदीनं केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काश्मीरमध्ये आपल्या हक्कासाठी लढणाऱ्यांचा, स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय असा आरोप शाहीद अफ्रिदीनं केला आहे. 


कोहलीची प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद आफ्रिदीला भारताचा कर्णधार विराट कोहलीसह अन्य क्रिकेटपटूंनी खडेबोल सुनावले आहेत. जी गोष्ट भारताच्या हिताला बाधा पोहोचवेल त्याचं मी कधीच समर्थन करणार नाही. एक भारतीय म्हणून देशाचं हित तुमचं पहिले प्राधान्य असेल. मी सुद्धा देशाच्या भल्याचा विचार करतो. कोणी त्या विरोधात असेल तर मी त्याचं कधीच समर्थन करणार नाही.'




आफ्रिदीला सुनावलं


शिवाय संयुक्त राष्ट्र संघ याविषयी गप्प का बसलाय असंही शाहीद अफ्रिदीनं म्हटलंय. काश्मीरच्या मुद्द्यावर याआधीही शाहीद आफ्रिदीनं वादग्रस्त ट्विट्स केले आहेत. आफ्रिदीच्या या ट्विटला ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. कसोटी पटू गौतम गंभीरनं शाहिद अफ्रिदीची अक्कल काढून शाहीदच्या लेखी UNचा अर्थ अंडर नाईंटीन असा असल्याचं गंभीरनं म्हटलं आहे.