कोलकाता : १६ वर्षांपूर्वी लॉर्ड्सच्या ड्रेसिंग रूममध्ये सौरव गांगुलीनं शर्ट काढून केलेलं सेलिब्रेशन सगळ्याच क्रिकेट चाहत्यांच्या नेहमीच लक्षात राहिल. भारताचा सध्याचा कॅप्टन विराट कोहलीही तो क्षण विसरू शकत नाही. विराट कोहलीनं सौरव गांगुलीच्या शर्ट काढण्याच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे. 


ऐतिहासिक सामन्याबाबत विराटच्या आठवणी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी मी फक्त १३ वर्षांचा होतो. दादा आणि वीरूनं चांगली सुरुवात केली होती. इंग्लंडमध्ये त्यावेळी असं लक्ष्य गाठणं खूप कठीण असायचं तरी मला जिंकण्याचा विश्वास होता. पण १५० रन्सवर भारताच्या ५ विकेट गेल्या तेव्हा मी उदास झालो आणि झोपून गेलो. भारत जिंकल्याचं मला जेव्हा कळलं तेव्हा मी स्वप्न बघत असल्यासारखं मला वाटलं, असं कोहली म्हणाला आहे. 


गांगुलीचं टी शर्ट काढून केलेलं सेलिब्रेशन स्वाभाविक होतं. अशा गोष्टी तात्काळ होऊन जातात. ही प्रतिक्रिया एवढी असली असते की लोकं माझ्याबद्दल काय बोलतील याचा विचार करायलाही वेळ नसतो. ती लॉर्ड्सची गॅलरी होती पण असं सेलिब्रेशन कुठेही होऊ शकतं. तो आनंद खराखुरा होता आणि कोणतीही गोष्ट मिळवल्यावर अशाप्रकारचा आनंद होणं स्वाभाविक आहे. अशाच प्रकारे मी स्वत:ला व्यक्त करु इच्छीतो. यामध्ये काहीही गैर नाही कारण माणसाच्या भावना बाहेर येतात, अशी प्रतिक्रिया कोहलीनं दिली आहे. खेळाडू हा रोबोट नाही जो प्रत्येकवेळी लोकं काय म्हणतील याचा विचार करेल, असं वक्तव्य कोहलीनं केलं आहे.