नवी दिल्ली : विराट आणि अनुष्का या दाम्पत्याची प्रेमकथा तशी सर्वपरिचित. पण, तरीही या दाम्पत्याच्या अनेक लिला या लक्षवेधी असतात. म्हणूनच त्यांच्या चाहत्यांसाठी प्रसारमाध्यमेही या लिलांची दखल घेतात आणि बातम्या देतात. समाज माध्यमांमधून (सोशल मीडिया) व्हायरल झालेले विराट-अनुष्काची ही छायाचित्रे प्रसारमाध्यमांमधून बातम्यांचा विषय ठरली आहेत.


 दोघेही एकमेकांच्या विरहात  व्याकूळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, ही छायाचित्रे विमातळावर झालेल्या विराट-अनुष्काच्या भेटीचे आहेत. आपापल्या क्षेत्रात व्यग्र असल्यामुळे दोघेही साधारण दोन महिने एकमेकांना भेटले नव्हती. विराट आपल्या क्रिकेट दौऱ्यासाठी देशाबाहेर तर, अनुष्का आगामी चित्रपट 'परी' आणि 'झिरो'च्या कामात गुंतलेली. त्यामुळे दोघांनाही बराच काळ एककमेकांना भेटता आले नाही. कदाचित त्यामुळे दोघेही एकमेकांच्या विरहात चांगलेच व्याकूळ झाले असावेत.




विराटला आवेग आवरला नाही


एकमेकांना भेटायची प्रचंड उत्सुकता असल्याने चित्रिकरणासाठी देशाबाहेर असलेली अनुष्का मुंबईला परतत होती. त्यामुळे तिला घ्यायला स्वत: विराट कोहली मुंबई विमानतळावर हजर होता. अपेक्षे प्रमाणे अनुष्का मुंबई विमानतळावर उतरली आणि दोघांची भेट झाली. मात्र, अनुष्काला पाहताच विराटला आवेग आवरला नाही. त्याने चक्क तिला करकचून मिठीच मारली. अर्थातच हा दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यांनी टीपला नसता तरच नवल. अतिशय बोलके असलेले हे फोटो सध्या समाज माध्यमात भलतेच व्हायरल झाले आहेत.