मुंबई : आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या टी-20 रॅकिंगमध्ये विराट कोहली बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर बॉलरच्या यादीमध्ये जसप्रीत बुमराह दुसऱ्या क्रमांकावर तर आर.अश्विन दहाव्या क्रमांकावर आहे. ऑल राऊंडरच्या यादीमध्ये युवराज सिंग पाचव्या क्रमांकावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीनं जाहीर केलेल्या बॅट्समनच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऍरोन फिंच दुसऱ्या आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सन तिसऱ्या क्रमांकावर आहे. बॉलरच्या यादीमध्ये पाकिस्तानचा स्पिनर इमाद वसीम पहिल्या आणि दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर तिसऱ्या क्रमांकावर आहे.


ऑल राऊंडरच्या यादीमध्ये बांग्लादेशचा शाकीब अल हसन पहिल्या, ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल दुसरा, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी तिसऱ्या क्रमांकावर आहे.


आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये न्यूझीलंड पहिल्या, इंग्लंड दुसऱ्या, पाकिस्तान तिसऱ्या आणि भारत चौथ्या क्रमांकावर आहे.