Bikini Day : फॅशन डिझायनर नाही तर ऑटोमोबाइल इंजिनिअरने केला बिकिनीचा आविष्कार, अणुबॉम्बशी आहे नावाचा संबंध

Bikini Day : दरवर्षी 5 जुलैला आंतरराष्ट्रीय बिकिनी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ही बिकिनीची फॅशन कधी आणि कशी सुरु झाली, हे नाव कसं पडलं आणि त्याचा शोध कोणी लावला याबद्दल आजही अनेकांना माहिती नाही. आज बिकिनी डे निमित्त बिकिनीचा रंजक इतिहासावर एक नजर टाकूयात. 

| Jul 05, 2024, 08:54 AM IST
1/8

आजवर सर्वाधिक चर्चेत राहिलेला कपड्यांचा फॅशनबद्दल बोलायचं झालं तर ते म्हणजे बिकिनी फॅशन. सेलिब्रिटी असो वा सर्वसामान्य यांच्या आज बीच फॅशन म्हणून बिकिनीला सर्वाधिक पसंती मिळते. भारतीय संस्कृतीत आजही बिकिनीला खुलेपणाने स्विकारलं गेलं नाही. पण पाश्चात संस्कृतीत बिकिनी ही सर्वसामान्य आहे. 

2/8

फ्रेंचचे ऑटोमोबाईल इंजिनिअर आणि कपड्यांचं डिझायनर Louis Reard यांनी बिकिनीची निर्मिती केली. त्यानंतर 5 जुलै 1946 मध्ये Micheline Bernardinin लावाच्या मॉडेलने ती सार्वजनिक ठिकाणी परिधान केली. 

3/8

 तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, बिकिनीचा संबंध हा अणुबॉम्बशी आहे. तर तो असा की बिकिनीचं नाव हे bikni atoll या जागेच्या नावावरून ठेवण्यात आलं आणि इथेच अणुबॉम्बची चाचणी झाली होती. लुई रीअर्डचा हा आविष्कारही बॉम्बसारखा मानला गेला आणि म्हणूनच त्याला बिकिनी असं नाव देण्यात आलं. 

4/8

जेव्हा या बिकिनीचा शोध लागला त्यावेळी सेलिब्रिटी आणि मॉडेल्सही तो घालण्यास नकार देत होते. अगदी जाहिरातीसाठी कोणी सापडत नव्हतं. त्यावेळी 19 वर्षीय डान्स मिशेलिन हिने जाहिरातीसाठी तयारी दर्शवली. या जाहिरातीमुळे ती जगभरात प्रसिद्ध झाली. 

5/8

आज आपण बीचवर गेल्यास अनेक महिला या बिकिनी घालून दिसतात. पण एक काळ असा होता जेव्हा इटली, अमेरिका आणि स्पेनसारखा शहरात बिकिनीवर बंदी घालण्यात आली होती. बंदी उठल्यानंतर 4 वर्षांत बिकिनीने जगभरातील बाजारपेठांमध्ये आपला ठसा उमटवला. 

6/8

बिकिनी ही ब्यूटी कॉन्टेस्टमधील एक भाग असला तरी पहिल्यांदा तो 1951 मध्ये पहिल्यांदा मिस वर्ल्डच्या ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये घालण्यात आली होती. 

7/8

त्यानंतर बिकिनी पुन्हा चर्चेत आली ती 1953 मध्ये. जेव्हा अभिनेत्री Bridget Bardot हिने कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये बिकिनी घातली. त्यानंतर अभिनेत्री या बिकिनीमध्ये दिसू लागल्यात. 

8/8

मग 1960 मध्ये playboy आणि sports illustrated या मॅगझिनच्या कव्हर पेजवर बिकिनीचं डिझाइन झळकलं.