मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली हा भारतातला सगळ्यात मोठा ब्रॅण्ड बनला आहे. विराट कोहलीनं बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला मागे टाकलं आहे. राईज ऑफ द मिलेनियन्स : इंडियाज मोस्ट व्हॅल्यूएबल सेलिब्रिटी ब्रॅण्डनं ही यादी जाहीर केली आहे. कोहलीबरोबरच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगही या यादीमध्ये आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख या यादीमध्ये पिछाडीवर गेला असला तरी पहिल्या १५ जणांच्या यादीमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटींचा दबदबा कायम आहे. पण कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि पी.व्ही.सिंधू या सेलिब्रिटींना जोरदार टक्कर देत आहेत. कमाईच्या बाबतीत कोहलीनं स्टार फूटबॉलपटू लिओनल मेसीलाही मागे टाकलं आहे.


फोर्ब्सच्या यादीनुसार विराटची कमाई १४.५ मिलियन डॉलर एवढी आहे. जागतिक यादीमध्ये विराट कोहली सातव्या क्रमांकावर तर मेसी नवव्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीला इन्स्टाग्रामवर एखाद्या ब्रॅण्डचं प्रमोशन केलं तर पाच लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच ३.२ कोटी रुपये मिळतात.


इन्स्टाग्रामवर कोहलीचे १५ मिलियन म्हणजेच दीड कोटी फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर कोहलीला २० मिलियन म्हणजेच २ कोटी आणि फेसबूकवर तीन कोटी ६० लाख फॉलो करतात. सोशल नेटवर्किंगवर कोणत्याही ब्रॅण्डचं प्रमोशन केलं तर कोहलीला ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळतात. फोर्ब्सच्या यादीनुसार विराटची एकूण संपत्ती १२ मिलियन अमेरिकन डॉलर एवढी आहे.