Virat Kohli: कोण बोल बच्चन? कोण आळशी? विराटने सांगितले ड्रेसिंग रूमचे किस्से!
Virat Kohli Reveals Ravindra Jadeja Secrets: एखादा पाहुणा कपिलच्या टप्प्यात आला तर त्याची सुट्टी नसतेच, असंच काहीसं पहायला मिळालं. विराट बोलू लागला, त्यावेळी कपिलने गुगली फेकली.
Virat Kohli Reveal Indian Cricket Team Dressing Room Secrets: आयपीएलच्या सामन्यांमुळे खेळाडूंमध्ये मोठी स्पर्धा असते. कोणाला टीम इंडियामध्ये (Team India) संधी मिळेल, यासाठी चढाओढ सुरू असल्याचं दिसतं. मात्र, कधी स्पर्धेमुळे खेळाडूंचे संबंध कधी दुरावले गेले, असं काही पहायला मिळत नाही. ड्रेंसिंग रूममध्ये (Dressing Room) देखील खेळांडूंची धमाल पहायला मिळते. अशातच आता भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) ड्रेसिंग रूममधील किस्से सांगितले आहेत.
कधी कधी असे प्रसंग येतात जेव्हा क्रिकेटपटू स्वतःच आपल्या सहकाऱ्यांचा पर्दाफाश करतात. कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्या शोमध्ये एकदा असंच काहीसं पहायला मिळालं. विराट कोहली कपिलच्या शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये दिसला होता. त्यावेळी विराटने सर्वांची पोलखोल केली होती.
एखादा पाहुणा कपिलच्या टप्प्यात आला तर त्याची सुट्टी नसतेच, असंच काहीसं पहायला मिळालं. विराट बोलू लागला, त्यावेळी कपिलने गुगली फेकली. कपिलने झटपट राऊंडला सुरूवात केली. त्यावेळी एकावर एक बाऊंसर प्रश्न कपिलने पाठवले. टीम इंडियामध्ये सर्वात बोल बच्चन (Feku) कोण?, यावर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), असं लगेच उत्तर विराटने दिलं.
जडेजाचा किस्सा-
रविंद्र जडेजा एकदा म्हणाला, आमच्याकडे एका घोड्यावर बसलेल्या राजाचं चित्र आहे. त्याचे दोन्ही पाय हवेत आहेत. दरवर्षी चित्र वेगळं दिसतं. एका वर्षात उजवा पाय वर दिसतो. तर दुसऱ्या वर्षात दुसरा पाय वर दिसतो. या लेवलचा बोल बच्चन जडेजा (Virat Kohli On Ravindra Jadeja) आहे, असं विराटने सांगितलं.
त्यानंतर पुढचा प्रश्न कपिलने फेकला. टीम इंडियामध्ये सर्वात आळशी कोण?, त्यावर विराटने मोहम्मद शमीचं (Mohammed Shami) नाव घेतलं. विराट म्हणतो, आमच्या ड्रेसिंग रूममध्ये (Virat Kohli Reveals Dressing Room Secrets) माने काका आहेत, जे सर्व खेळाडूंचा मसाज करतात. त्यांच्या रूममध्ये सगळं काही असतं. चहा बनवलेला असतो. बिस्किट ठेवलेले असतात. तर काही चटपटीत खायला असतं. तसेच त्यांचा सोफा देखील भारी आहे. ते गरम तेलाने चांगला मसाज करून देतात. आमचा हा पठ्ठ्या शमी... गेल्यावर विसरून जातो की आपण कशासाठी आलोय. तो तिथंच बसून बसून झोपून जातो. विराटने किस्सा सांगितल्यानंतर अनेकांनी हसू आवरलं नाही.