India vs New Zealand: संजू तुस्सी ग्रेट हो...! संघात संधी नाही, पण पठ्ठ्यानं मन जिंकलं; पाहा Video

Sanju Samson heart winning video: आजच्या सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शिखर धवने (Shikhar Dhawan) आज पुन्हा रिषभ पंतवर (Rishabh Pant) विश्वास दाखवला.

Updated: Nov 27, 2022, 05:01 PM IST
India vs New Zealand: संजू तुस्सी ग्रेट हो...! संघात संधी नाही, पण पठ्ठ्यानं मन जिंकलं; पाहा Video title=
sanju samson

IND vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड  (India vs New Zealand) यांच्यात खेळल्या जात असलेल्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज हेमिलटनच्या (Seddon Park, Hamilton) सिडोन पार्कवर खेळला गेला. मात्र, हा सामना अखेर पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. आजच्या दिवसात अवघ्या 12.5 ओव्हर्सचा खेळ झाला. त्यानंतर पावसाचं आगमन (Rain in India vs New Zealand 2nd ODI) झाल्याने खेळ थांबवावा लागला. त्यानंतर पावसाची रिपरिप सुरूच राहिली आणि सामना रद्द करावा लागला.

तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 1-0 ने आघाडी कायम ठेवली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबरला क्राइस्टचर्चमध्ये (India vs New Zealand 3rd ODI) खेळवला जाईल. त्यामुळे आता अंतिम सामना भारतासाठी करो किंवा मरोचा असणार आहे. आजच्या सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शिखर धवने (Shikhar Dhawan) आज पुन्हा रिषभ पंतवर (Rishabh Pant) विश्वास दाखवला.

आणखी वाचा - IND vs NZ : पावसाने टीम इंडियाचा खेळ केला खल्लास, आयसीसी रँकिमध्ये घसरण

सामन्यात संधी मिळाली नाही, त्यामुळे मैदानावर चमक दाखवता आली नाही, अशातच संजूने केलेल्या एका कामगिरीमुळे संजूने सर्वांचं मन जिंकलं आहे. झालं असं की, पावसामुळे दोन वेळा सामना रोखण्यात आला होता. त्यावेळी ग्राऊंडमॅन मैदानातील कवर झाकत होते. त्यावेळी जोरदार वारं देखील सुटलं. त्यावेळी ग्राऊंडमॅनला (Groundman) वाऱ्यामुळे कवर आवरता आलं नाही. त्यावेळी संजू मदतीला धावून आला (Helped groundsmen). त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (sanju samson heart winning video)  होताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, आजचा सामना (ind vs nz 2nd odi) भारताने जिंकला असता तर 9 वर्षांनंतर भारतीय संघाला न्यूझीलंडने आयोजित केलेल्या वनडे मालिकेत पराभूत करण्याची संधी होती. आता 30 नोव्हेंबरला होणारी तिसरी वनडे भारताने जिंकली तर मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटेल. त्यामुळे आता भारताचं स्वप्न अपूर्णच राहिल्याचं पहायला मिळतंय