मुंबई : न्यूझीलंड विरोधात सुरु होणाऱ्या सीरिजसाठी टीम इंडियाचं सिलेक्शन काही दिवसांपूर्वी झालं. मात्र, टीममध्ये आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना का घेतलं नाही? असा प्रश्न विचारण्यात येत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पिनर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचं सिलेक्शन का नाही केलं या प्रश्नावर कुणीच उत्तर देत नव्हतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर स्वत: विराट कोहीलीने दिलं आहे. न्यूझीलंड विरोधात सुरु होणाऱ्या पहिल्या वन-डे मॅचपूर्वी कॅप्टन विराट कोहलीने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.



विराट कोहलीने मान्य केलं की, सध्याच्या टीममध्ये असलेले कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोन स्पिनर्सची जोडी खूपच चांगलं प्रदर्शन करत आहे.



विराटने पूढे म्हटलं की, "आम्हाला वर्ल्डकपपूर्वी सर्वोत्तम बॉलर्स शोधायचे आहेत. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, कुलदीप आणि युजवेंद्र यांना खेळवण्याचा आम्ही विचार केला नव्हता. पण, हे दोघेही खरचं खूप चांगलं प्रदर्शन करत आहेत आणि त्यामुळे ते प्रत्येक मॅचमध्ये खेळत आहेत.


चांगल्या फॉर्मात असलेला बॅट्समन अजिंक्य रहाणे टीमचा तिसरा ओपनर बॅट्समन आहे असं विराट कोहलीने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच न्यूझीलंड विरोधात होणाऱ्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये अजिंक्य खेळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा हे दोघेजण टीम इंडियाचे ओपनर बॅट्समन आहेत.


शिखर धवनच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेला खेळण्याची संधी देण्यात आली. त्याने ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये सलग चार हाफ सेंच्युरी लगावल्या. भारताने ही सीरिज ४-१ने जिंकली होती.