`मला वाईट वाटलं जेव्हा....`; अखेर मनातील खदखद Virat Kohli बोलून दाखवलीच
या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
मुंबई : गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात अखेर रन मशीन विराट कोहलीची बॅट तळपलीच. या सामन्यात विराट कोहलीने 73 रन्सची सर्वोत्तम खेळी केली. शिवाय या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरूने गुजरात टायटन्सचा पराभव करत प्लेऑफच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. दरम्यान या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यानंतरच्या हर्षा भोगलेशी बोलताना विराट कोहलीने सांगितलं की, तो टीमसाठी विशेष काही करू शकत नसल्याने तो स्वतःवरच नाराज होता.
विराट कोहली म्हणाला की, हा एक महत्त्वपूर्ण सामना होता. मला वाईट वाटत होतं कारण मी टीमसाठी काहीच करू शकत नव्हतो. हीच गोष्ट मला फार सतावत होती की माझे आकडे चांगले नाहीत. माझी ही खेळी टीमसाठी इम्पॅक्ट क्रिएट करण्यासाठी यशस्वी ठरलीये.
मी खरंच खूप मेहनत केली आहे. मी काल नेट्समध्ये 90 मिनिटं फलंदाजी केली. त्यामुळे मी खूप मुक्तपणे आणि रिलॅक्स होऊन मैदानावर उतरलो होतो. मी जे काही मिळवलं आहे त्यासाठी मी कृतघ्न असल्याचंही विराट कोहलीने सांगितलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सवर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. गुजरातने विजयासाठी 169 धावांचे दिलेलं आव्हान आरसीबीने 8 बॉल आणि 8 विकेट्स राखून पूर्ण केलं. या विजयासह आरसीबीने प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
विराट कोहली आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला. विराटने 73 धावांची अर्धशतकी खेळी केली. कॅप्टन फाफ डु प्लेसिसने 44 धावांची संयमी खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 40 धावा करत आरसीबीला विजयापर्यंत पोहचवलं.