अँटिग्वा : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने नव्या प्रशिक्षपदासाठी निवड प्रक्रिया सुरु केलीये. कुंबळेंनी राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीशी मतभेद झाल्याचे मान्य केले होती. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवागसह अनेक दिग्गज सहभागी झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीला कुंबळेंबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मी त्यांचा आदर करतो असे सांगत त्याने उत्तर देणे टाळले. मात्र प्रशिक्षक निवडीबाबत त्याला विचारले असता, विराट म्हणाला, बीसीसीआयने याबाबत आमचे मत विचारल्यानंतर आम्ही मत देऊ.


विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यातील संबंध पाहता जाणकारांनी रवी शास्त्री प्रशिक्षक होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केलीये. 


कोहलीला जेव्हा नव्या प्रशिक्षकाबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, व्यक्तिगत पातळीवर मी काही बोलू शकत नाही. एक संघ म्हणून जेव्हा बीसीसीआय आमचे मत विचारेल तेव्हाच आम्ही सांगू.