नवी दिल्ली :  दक्षिण अफ्रिकेविरूद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत भारताने शानदार विजय मिळवला. या विजयावर कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रियेदरम्यान, विराटने आपल्या कामगिरीचे पूर्ण श्रेय हे पत्नी अनुष्काला दिले आहे. 'आपल्या सोबतच्या कठीण प्रसंगात ती नेहमीच माझी ताकद बनून राहते', असे सांगतानाच 'माझ्या सोबतच्या सर्वच लोकांना माझ्या कामगिरीचे श्रेय जाते' असेही तो म्हणाला.


करिअरमधली ८ ते ९ वर्षेच राहिली...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आपला उत्साह कायम ठेवत सदैव सदिच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानत विराट आपल्या प्रितक्रियेत म्हणतो,  'माझ्या क्रिकेट करिअरमधली अवघी आठ ते नऊ वर्षे राहिली आहेत. त्यामुळे या संधीचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याचा माझा विचार आहे. ही खूपच आनंदाची बाब आहे की मी तंदुरूस्त आहे आणि मला नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे.'


गोलंदाजांच्या कामगिरीवर विराट खूश


दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरूद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत ऐतिहासिक कामगिरी पार पडण्यास गोलंदाजांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून विराट गोलंदाजांच्या कामगिरीवर प्रचंड खूश आहे. तो म्हणतो मी प्रचंड खूश आहे. या वेली गोलंदांजांनी खूपच चांगली कामगिरी केली. या मैदानावर खेळताना फारच मजा आली. खेळाचा पूर्ण आनंद घेता आला. या वेळी आम्ही बॉलच्या टायमिंगवर विशेष ध्यान दिले.