बर्मिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक झळकवलं. कसोटी कारकिर्दीमधलं विराटचं हे २२वं शतक आहे. एकीकडे विराट कोहलीचा संघर्ष सुरु असताना भारतीय टीमची बॅटिंग मात्र गडगडली. कोहली वगळता दुसऱ्या कोणत्याही बॅट्समनला मोठा स्कोअर करता आला नाही. विराट कोहलीच्या शतकामुळे इंग्लंड आणि भारतामधला रनचा फरक कमी झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीचं इंग्लंडच्या जमिनीवरचं हे पहिलं टेस्ट शतक आहे. २०१४ सालच्या सीरिजमध्ये विराट कोहलीला संघर्ष करावा लागला होता. त्या सीरिजमध्ये विराटला केवळ एकच अर्धशतक करता आलं होतं. यावेळी मात्र पहिल्या टेस्टच्या पहिल्याच इनिंगमध्ये विराटनं शतक करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. या शतकाबरोबरच विराटनं काही रेकॉर्डही स्वत:च्या नावावर केली आहेत.


कर्णधार असताना सर्वाधिक शतकं


ग्रॅम स्मिथ- २५


रिकी पाँटिंग- १९


अॅलन बॉर्डर/ स्टिव्ह वॉ/ स्टीव्ह स्मिथ/ विराट कोहली : १५


२२ शतकांसाठी कमीत कमी इनिंग


सर डॉन ब्रॅडमन- ५८ इनिंग


सुनिल गावसकर- १०१ इनिंग


स्टिव्ह स्मिथ- १०८ इनिंग


विराट कोहली- ११३ इनिंग


सचिन तेंडुलकर- ११४ इनिंग


मोहम्मद युसूफ- १२१ इनिंग 


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा