नवी दिल्ली : या वर्षाच्या अखेरीस श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या सीरिजमध्ये विराट कोहली खेळू इच्छित नाही. व्यक्तिगत कारण पुढे करत आपल्याला काही काळ विश्रांतीची गरज असल्याचे विराटने म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, विराटने खरोखरच विश्रांती घेतली तर, भारताला श्रीलंकेविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या वन डे सीरीज आणि टी-२० सीरजमध्ये वेगळा विचार करावा लागेल. भारतीय संघाला श्रीलंकेविरूद्ध १६ ते २४ डिसेंबरमध्ये तीन टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी २० सामने खेळायचे आहेत.


कोहलीने बीसीसीआयला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आपण व्यक्तिगत कारणांमुळे श्रीलंकेविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या सीरिजमध्ये सहभागी होऊ शकत नाही. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, विराट कोहली गेले बराच काळ क्रिकेट टूर्नामेंट खेळत आहे. त्यात त्याने आपली कामगिरीही उत्कृष्ट ठेवली आहे. तरीसुद्धा काहीशी विश्रांती घ्यावी असे त्याला वाटत आहे. म्हणून त्याने बीसीसीआयला तशी कल्पनाही दिली आहे. दरम्यान, जानेवारीमध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यात विराट सहभागी होणार आहे.


न्यूझीलंड दौऱ्यासाठी आज संघनिवड


निवड समिती आज (सोमवार) मुंबई येथे खेळाडूंच्या मुलाखती घेऊन न्यूझीलंड विरूद्ध खेळल्या जाणाऱ्या टी २० सीरिजसाठी संघाची निवड करणार आहे. 


दरम्यान, भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्ध तीन सामन्यांची वनडे सीरीज खेळत आहे. वानखेडेवर झालेल्या पहिल्या वनडेत टॉम लाथम (नाबाद १०३) आणि रॉस टेलर (९५) यांच्या दुहेरी शतकी भागीदारीमुळे भारताला सहा गडी राखून पराभूत केले. या विजयासोबत न्यूझीलंडने या सीरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.