एजबस्टन : इंग्लंडने टीम इंडियावर पाचव्या टेस्ट सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 378 रन्सचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. यावेळी सर्व खेळाडूंवर भारतीय चाहत्यांचा रोष दिसून येतोय. अशातच माजी कर्णधार विराट कोहलीवर मात्र चाहते चांगलेच संतापले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीचा मैदानावरील एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. रवींद्र जडेजा गोलंदाजी करत असताना स्लिपमध्ये विराट कोहलीने असं काही कृत्य केलं, ज्यामुळे चाहते त्याच्यावर चांगलेच संतापले आहेत. 


झालं असं की, रवींद्र जडेजा गोलंदाजी करत असताना कोहली स्लीपमध्ये उभा होता. जडेजा हा बॉल टाकण्यापूर्वी भारताचा पराभव निश्चित होता. यावेळी भारतीय खेळाडूंसह चाहतेही प्रचंड निराश होते. मात्र यावेळी माजी कर्णधार कोहली मात्र निराश तर सोडाच तो स्लीपमध्ये उभं राहून हसत असल्याचं पाहायला मिळालं. 



इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात पराभव तोंडावर असताना कोहली स्लीपमध्ये हसत उभा राहिला होता. चाहत्यांना हीच गोष्ट सर्वात जास्त खटकली. त्यामुळे विराटवर जोरदार टीकाही करण्यात येतेयं.


इंग्लंडचा विजय 


सामन्यात जो रुटने 82 च्या स्ट्राईक रेटने 28 वं शतक पूर्ण केलं. तर जॉनीने 78 च्या स्ट्राईक रेटने 115 धावा कुटल्या. विशेष म्हणजे जॉनीचं हे सलग चौथं आणि कारकिर्दीतील 12 वं कसोटी शतक ठरलं. या दोघांनी चौथ्या डावात नाबाद 269 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील चौथ्या ते त्याखालच्या विकेटसाठीची विक्रमी भागीदारी ठरली.