विजयानंतर कोहलीने हार्दिक सोबतचा हा व्हिडिओ केला शेअर
इंदूर वनडेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली होती. 7२ चेंडूंत 78 धावा करणाऱ्या हार्दिक पंड्याने धमाकेदार खेळी केली. कर्णधार विराट कोहली त्याच्या या कामगिरीबद्दल खूप आनंदी आहे.
इंदूर : इंदूर वनडेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली होती. 7२ चेंडूंत 78 धावा करणाऱ्या हार्दिक पंड्याने धमाकेदार खेळी केली. कर्णधार विराट कोहली त्याच्या या कामगिरीबद्दल खूप आनंदी आहे.
मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट राखून विजय मिळवल्यानंतर विराटने पंड्याची प्रशंसा केली. पंड्याला मुलाखत देताना तर टीम इंडियाच्या विजयाची नायक म्हणूनच त्याने त्याची प्रशंसा केलीच पण रात्री सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन त्याला 'पंड्या सुपरस्टार' असल्याचं देखील म्हटलं आहे.
पाहा व्हिडिओ