लंडन : राखी पौर्णिमा देशभरामध्ये उत्साहात साजरी होत आहे. भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीनंही राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी विराटनं त्याच्या बहिणीसोबतचा एक जुना फोटो फेसबूकवर शेअर केला आहे. भावना दिदी सोबतची एक आठवण... जगातल्या सगळ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा असं कॅप्शन विराटनं या फोटोला दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भारतीय टीम सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यामध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तिसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटनं ९७ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १०३ रन केले. विराटच्या या कामगिरीमुळे भारतानं तिसरी टेस्ट २०३ रननी जिंकली. तिसऱ्या टेस्टप्रमाणेच पहिल्या टेस्ट मॅचमध्येही विराटनं १४९ आणि ५१ रन केले. या सीरिजमध्ये ४०० पेक्षा जास्त रन करणारा विराट हा एकमेव बॅट्समन आहे. ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत २-१नं पिछाडीवर आहे. सीरिजची चौथी टेस्ट मॅच ३० सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.