बंगळूरू : बंगळूरूमध्ये भारत विरूद श्रीलंका यांच्यात टेस्ट सामना सुरु आहे. या सामन्यासाठी 100 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी विराट कोहलीचे अनेक चाहते स्टेडियममध्ये उपस्थित होते. यावेळी कोहलीसाठी आणि टीम इंडियासाठी त्यांचा जोश पाहण्यासारखा होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळूरूचं चिन्नास्वामी स्टेडियम हे आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचं होम ग्राउंड देखील आहे. दुसऱ्या सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या डावात स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते आरसीबी-आरसीबी असं ओरडत होते. यावेळी कोहलीने हाताने हार्ट बनवून दाखवलं. त्याचसोबत जर्सीच्या आत घातलेला त्याचा लाल टी-शर्टही विराटने दाखवला.



शनिवारी म्हणजे आरसीबीच्या नव्या कर्णधाराची घोषणा केलीये. त्यानुसार आता फाफ ड्यू प्लेससला कर्णधारपदाची धुरा सांभाळावी लागणार आहे. शिवाय यापूर्वी विराटला पुन्हा कर्णधार बनवणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.


आरसीबी टीमच्या कर्णधारपदासाठी फाफ ड्यू प्लेसीससह विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांची नाव चर्चेत होती. अखेरी फाफ ड्यू प्लेसीसच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यापूर्वी विराट कोहलीने आरसीबीचं कर्णधारपदं सांभाळलं होतं. मात्र गेल्या वर्षी त्याने या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता आरसीबीची कमान फाफ सांभाळणार आहे.