मुंबई : इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेली टीम इंडिया सराव सामन्यासाठी लीसेस्टरला पोहोचलीये. पुनर्निर्धारित कसोटी सामना एजबॅस्टनमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया 24 जूनपासून चार दिवसीय सराव सामनेही खेळणार आहे. ही टेस्ट जिंकून टीम इंडियाला 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज जिंकायची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सिरीज 1-0 ने जिंकली होती आणि आता पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतल्याने पुन्हा एकदा टेस्ट सिरीज जिंकण्याच्या मार्गावर आहे. पुनर्नियोजित पाचव्या कसोटीसाठी भारताला रोहित शर्मा नवा कर्णधार आणि राहुल द्रविड नवा मुख्य प्रशिक्षक आहे. 


दरम्यान या सराव सामन्यापूर्वी टीम इंडियाचा एक व्हिडीयो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विराट कोहली टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसोबत चालताना दिसत नाहीये. विराट कोहलीच्या या कृत्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय.


सराव सामन्यापूर्वी टीम इंडिया लीसेस्टरला पोहोचली तेव्हा लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय. भारतीय खेळाडू सरावासाठी स्टेडियममध्ये जाताना दिसतायत. यादरम्यान टीममधील बाकीचे खेळाडू वगळता कॅमेरामनचा फोकस केवळ विराट कोहलीवर होता.


ज्यावेळी कॅमेराचं विराटवर फोकस केला तेव्हा तो टीमच्या बाकी खेळाडूंना सोडून मागे एकटाच चालत होता. यावेळी त्याच्या हातात कॉफीचा कपही होता.



काही चाहत्यांना विराटचा हा स्वॅग आवडला, पण काही चाहत्यांनी विराटला टीमपासून वेगळा स्पॉट झाल्यामुळे फटकारलंय. एका चाहत्याने विराटला ट्रोल करत टीमसोबत राहा, हिरो बनू नका, असं लिहिलं. तर दुसऱ्या एका चाहत्याने टीममधील एका नव्या वादाकडे लक्ष वेधलंय.