मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी नवा पाहुणा येण्याचा आनंद सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला होता. इंस्टाग्रामवर पोस्ट करत अनुष्का शर्मा बेबीबंप दाखवत फोटो शेअर केला. यानंतर या दोघांच्या 'आई-बाबा' होण्याची चर्चा रंगली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरूष्काने सोशल मीडियावर,'आणि आम्ही... लवकरच तीन होणार. २०२१ च्या जानेवारी महिन्यात येणार बाळं'. दोघांनी शेअर केलेल्या या पोस्टने साऱ्यांनाच आनंद झाला. आता विराट कोहलीने एका मुलाखतीत बाबा होण्याचा आनंद व्यक्त केला आहे. पहिल्यांदा अनुष्काच्या गरोदरपणावर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 



विराट म्हणतो, 'जेव्हापासून अनुष्का गरोदर असल्याचं कळलं आहे तेव्हा पासून आनंदाला सीमा राहिलेली नाही. हा अनुभव खूप अविश्वसनीय आणि खास आहे. आई-बाबा होणार हे कळल्यापासून आम्ही चंद्रावर आहोत. अनेकांनी ही गोड बातमी कळल्यावर आनंद व्यक्त केला. नव्या येणाऱ्या सदस्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. 



सध्या विराट आणि अनुष्का दुबईत आहेत. टी २० च्या सामन्याकरता विरुष्का दुबईत आहेत. तिथे गेल्यावर क्रिकेट संघाने त्या दोघांच जंगी स्वागत केलं. आई-बाबा होणाऱ्या विरूष्कासोबत खास सेलिब्रेशन देखील केलं.