IND vs PAK : विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध केली मोठी चूक, LIVE सामन्यात ड्रेसिंग रूममध्ये का परतला?
India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात टीम इंडियाच्या किंग कोहलीने (Virat Kohli) मोठी चूक केली. त्याला त्याला ड्रेसिंग रूममध्ये पुन्हा जावं लागलं.
Virat Kohli Mistakenly Wears Wrong Jersey : रंगारंग कार्यक्रमानंतर भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याला सुरूवात झाली. पाकिस्तानने पहिल्या इनिंगमध्ये 191 धावा केल्या अन् टीम इंडियाला 192 धावांचं आव्हान दिलं आहे. भारताच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत पाकिस्तानच्या खेळ 43 ओव्हरमध्ये आटोपला. 155 वर 2 गडी बाद अशी भक्कम परिस्थिती पाकिस्तानची होती. त्यानंतर पुढील 37 धावांच्या आत पाकिस्तानचे 8 फलंदाज बाद झाले. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. मात्र, या सामन्यात विराट कोहलीने मोठी चूक केली. विराटला (Virat Kohli) मैदान सोडून का जावं लागलं? पाहा...
विराट कोहलीने इतर खेळाडूंप्रमाणे टीम इंडियाची वर्ल्डकप जर्सी (Virat Kohli Mistakenly Wears Wrong Jersey) घातली नव्हती. दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजत असताना विराट जुन्या जर्सीमध्ये होता, ज्याच्या खांद्यावर तीन पांढरे पट्टे आहेत. मात्र, आपली चूक लक्षात येताच तो लगेच ड्रेसिंग रूमच्या दिशेने धावला. बीसीसीआयने (BCCI) वर्ल्ड कपसाठी खास जर्सी तयार केली आहे. यामध्ये तीन पट्ट्यांऐवजी खांद्यावर तिरंगा आहे. पण कोहलीने पांढऱ्या रंगाची जर्सी घातली होती. सामना सुरू असताना विराटला आपली चूक कळाली.
विराटने कॅप्टन रोहितला सांगून मैदान सोडलं अन् इशान किशन त्याच्या जागी मैदानात आला. थोड्या वेळात विराट पुन्हा मैदानात आला अन् आपली चूक सुधारली. मात्र, त्याच्या जुन्या जर्सीमधील फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
दरम्यान, पाकिस्तानने भारतासमोर 192 धावांचं आव्हान दिलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताने 5 ओव्हरमध्ये 44 धावा केल्या होत्या. तर शुभमन गिल 11 बॉलमध्ये 16 धावा करत बाद झाला. चार फोरच्या मदतीने शुभमनने धावा खेचल्या.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर.
पाकिस्तानचा संघ | बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद शकील, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफ्रिदी, हारिस रौफ.