मुंबई : विराट कोहली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो आपल्या प्रोजेक्ट संबधित अनेक गोष्टी पोस्ट करताना दिसतो. अनुष्का शर्मा प्रेग्नेंट असताना ही त्याने एक खास फोटो शेअर करत याबाबतची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्काने जानेवारी 2021 मध्ये मुलीला जन्म दिला. पण मुलीला जन्म दिल्यानंतर दोघांनीही तिचा चेहरा कॅमेरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप त्यांनी मुलीचा कोणताही फोटो शेअर केलेला नाही. 


मुलीला जन्म दिल्यानंतर लगेचच विराटने फोटोग्राफर आणि मीडियाला बाळाच्या प्राईव्हसीसाठी फोटो रिवील न करण्याची विनंती केली होती. अशीच विनंती तो व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये करताना दिसत आहे. 


टीम मुंबईहून दक्षिण आफ्रिकेला रवाना होत असताना भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने मीडियाला विनंती केली की,मुलगी वामिकाचे फोटो काढू नका.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, अभिनेत्री अनुष्का शर्मा मुलीसह टीमच्या बसमधून बाहेर येत असताना, विराट कोहलीने बसमधून आधी बाहेर येत मुंबईतील डिपार्चर टर्मिनलवर असलेल्या फोटोग्राफर्सना मुलीचे फोटो न काढण्याची विनंती केली. विराटचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.


त्यानंतर तेथील फोटोग्राफर्सने आपली कॅमेरे बंद केले. विराट आणि अनुष्का आपल्या मुलीची विशेष काळजी घेताना दिसतात. ते या लाईमलाईट पासून नेहमीच तिला दूर ठेवताना दिसतात."कृपया बाळाचे फोटो क्लिक करू नका" अशी विनंती विराट कोहली फोटोग्राफर्संना करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.