नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर अभिनव मुकुंदने सोशल मीडियावर वर्णभेदी टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. त्याच्या या भूमिकेचं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसहीत टीम इंडियातील काही खेळाडूंनी त्याला समर्थन दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनव मुकुंद याने वर्णभेदावरून केल्या जाणा-या वक्ताव्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले होते. ट्विटरवर मुकुंदने वर्णभेदावरून केल्या जात असलेल्या मेसेजवर निराशा व्यक्त केली होती.  आपल्या ट्विटर पेजवर केलेल्या एक वक्तव्यात मुकुंद याने त्वचेच्या रंगावरून पाठविण्यात आलेल्या मेसेजवर निराशा व्यक्त केली आहे. मुकुंदने याने सध्याच्या श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या टेस्टमध्ये दुसऱ्या डावात ८१ धावांची खेळी केली. 



तामिळनाडूच्या फलंदाजाने स्पष्ट केले की, या वक्तव्याचा भारतीय टीमच्या कोणत्याही खेळाडूशी संबंध नाही आहे. तो म्हणाला, मी या ठिकाणी सहानुभूती किंवा मला कोणी फेव्हर करावे असे म्हणत नाही. मला लोकांची मानसिकता बदलण्याची इच्छा आहे. मी वयाच्या १५ वर्षापासून देशांतर्गत आणि परदेशात फिरत आहे. लहानपणापासून माझ्या त्वचेचा रंग पाहून लोकांचा माझ्याशी वागण्याचा प्रकार मला त्रासदायक वाटला. 


मला खंत नाही की माझा रंग काळा आहे.. 



तो म्हणाला, जो क्रिकेट पाहतो, तो समजू शकतो की मी कडक उन्हात खेळतो. त्यामुळे माझा रंग काळा आहे, म्हणून मला त्याची खंत वाटत नाही. मी जे काही करतोय ते मला आवडते. यासाठी मी अनेक तास नेटमध्ये घालविले आहेत. मी चेन्नईत राहतो. जो देशातील सर्वात गरम भाग आहेत.