Virat Kohli Retirement: प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये त्याला तसेच त्याच्या चाहत्यांना नकोसा वाटणार मात्र टाळता न येणारा एक क्षण येतो तो म्हणजे निवृत्तीचा! सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी यासारख्या दिग्गजांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर जो काही भावानांचा महापूर आलेला तशीच काहीशी स्थिती रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या बड्या क्रिकेटपटूंनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सध्याच्या घडीला देशातील आघाडीच्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं.


विराट अचानक निवृत्ती घेऊ शकतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एकदा मी निघून गेलो की पुन्हा लवकर दिसणार नाही', असं विधान कोहलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या मनात नको त्या शंका निर्माण झाल्या. विराट कोहली सध्या कितीही तंदरुस्त असला तरी एक ना एक दिवस त्याला निवृत्ती स्वीकारावी लागणार आहे. सामान्यपणे भारतीय क्रिकेटपटू 39 व्या किंवा 40 व्या वर्षी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होतात. विराट सध्या 35 वर्षांचा आहे. मात्र त्याची शरीरयष्टी आणि स्टॅमिना पाहिल्यास वयाच्या 40 व्या वर्षी निवृत्त होणारा विराट पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरु शकतो याच त्याच्या चाहत्यांना कोणतीही शंका नाही. मात्र इंग्लडचा माजी कर्णधार मायकल वॉर्नने विराट अचानक निवृत्तीची घोषणा करु शकतो असे संकेत दिले आहेत. विराट कोहलीच्या खासगी आयुष्यात बराच बदल झाला असून आता तो दोन मुलांचा बाप आहे. त्यामुळेच तो क्रिकेटचं मैदान चाहत्यांच्या अपेक्षेपेक्षा फार आधीच सोडू शकतो असं वॉर्नचं म्हणणं आहे.


वेगळी शक्यता नाकारता येणार नाही


विशेष म्हणजे विराटने क्रिकेटपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देण्यास सुरुवात केल्याचंही वॉर्नने अधोरेखित केलं. विराटने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमधून माघार घेतली होती. अनुष्का गरोदर असल्याने तिच्यासोबत राहता यावं यासाठी विराट पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळला नव्हता. त्यामुळे हे असं सुरु राहिलं तर पुढील पाच वर्ष विराट खेळताना दिसेल असं म्हणणं असलं तरी वेगळी शक्यता नक्कीच नाकारता येत नाही, असा इशारा वॉर्नने चाहत्यांना दिला आहे.


नक्की वाचा >> ..तर शाहरुख खानच्या परवानगी शिवाय Team India चा Head निवडणं केवळ अशक्यच!


दोन-तीन वर्षात सारं काही बदलू शकतं


"विराटला यंदाचं पर्व (आयपीएलचं) उत्तम गेलं. तुम्ही सध्या विराटच्या निवृत्तीबद्दल बोलत असाल तर मला तो मला इतका फिट वाटतोय की अजून फार काळ खेळताना दिसेल, असं मी म्हणेन. मात्र त्याचं मतपरिवर्तन झालं तर काही सांगता येत नाही. त्याचं कुटुंबही तसं फार करुण आहे. दोन ते तीन वर्षाच्या काळात सारं काही बदलू शकतं आणि त्याला शांततेत कुटुंबासोबत वेळ घालवावा असं वाटू शकतं. मी हे पूर्णपणे समजू शकतो," असं वॉर्नने 'क्रिकबझ'शी बोलताना सांगितलं. विराट अचानक निवृत्ती जाहीर करु शकतो, असं वॉर्न म्हणाला आहे. त्यामागील कारण काय असू शकतं याबद्दलही त्याने भाष्य केलं आहे.


त्याला ती इच्छा झाली तर तो क्रिकेटपासून दूर जाऊ शकतो


"भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या कसोटी मालिकेमध्ये तो संघापासून दूर अशताना मला वाटतं तो लंडनला गेला अन् तिथे सामान्य व्यक्तीप्रमाणे जगत होता. मी त्याच्या काही कमेंट्स आणि वक्तव्य वाचली. त्याला समान्यांप्रमाणे जगायची फार इच्छा असल्याचं दिसलं. मला वाटतं त्याची हिच इच्छा त्याला क्रिकेटपासून कायमचं दूर घेऊन जाईल. अचानक त्याला शांतते आयुष्य जगावंसं वाटलं तर तो वेगळा (अचानक निवृत्तीचा) निर्णय घेऊ शकतो," असं वॉर्न म्हणाला.