मुंबई : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या फॉर्मवर सातत्याने टीका होत होत्या. अखेर काल गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात विराटने उत्तम फलंदाजी करत प्रत्युत्तर दिलं आहे. विराटच्या 73 रन्सच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने विजय मिळवला असून त्यांच्या प्लऑफच्या आशा अजूनही पल्लवीत झाल्या आहेत. टीम अशा परिस्थितीत असताना विराटचं एक धक्कादायक वक्तव्य समोर आलं आहे. 


आता मुंबईच्या हातात बंगळूरूचं भविष्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणार असल्याचं त्याने म्हटलंय. यामागचं कारण म्हणजे रॉयल चॅलेंजर बंगळूरूला जर प्लेऑफ गाठण्याची संधी ही मुंबई इंडियन्सच्या हरण्या-जिंकण्यावर अवलंबून आहे. 


उद्याच्या मुंबई विरूद्ध दिल्लीच्या सामन्यात जर मुंबई जिंकली तर बंगळूरूसा प्लेऑफमध्ये जाण्याची सरळ संधी आहे. यासाठीच आता विराट कोहली रोहित शर्माच्या सपोर्टमध्ये उतरणार आहे.


काय म्हणाला विराट कोहली पाहा एका क्लिकवर


मुंबईला चीअर करण्यासाठी विराट कोहली स्टेडियममध्ये राहणार उपस्थित?


गुजरातविरूद्धच्या सामन्यानंतर फाफ ड्यू प्लेसिसची बातचित करताना विराट कोहली म्हणाला की, "2 दिवसांपासून मी माझ्या पायांना शांत करण्याचा प्रयत्न करतोय. मी मुंबई इंडियन्सच्या टीमला सपोर्ट करणार आहे. कदाचित सपोर्टसाठी तुम्ही आम्हाला स्टेडियममध्येही पाहाल.