चिप्सच्या वादावर अखेर विराट कोहलीचं स्पष्टीकरण
आयपीएलमध्ये बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला त्याचा टीमला प्ले ऑफमध्ये पोहोचवता आलं नाही.
मुंबई : आयपीएलमध्ये बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला त्याचा टीमला प्ले ऑफमध्ये पोहोचवता आलं नाही. मैदानामध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या विराटचे आयपीएलदरम्यानच काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंवरून विराटवर टीकाही झाली होती. या फोटोंमध्ये विराट चिप्स खाताना दिसत आहे. फिटनेसचे दाखले देणारा विराट चिप्स का खातोय असा सवाल अनेक चाहत्यांनी विचारला. लवकरच याबद्दल स्पष्टीकरण देऊ असं विराट दोन दिवसांपूर्वी म्हणाला होता. एका जाहिरातीमध्ये विराट कोहली चिप्स खाताना दिसत आहे. या जाहिरातीच्या शेवटी विराटनं नेमकं हे काय प्रकरण आहे ते सांगितलं आहे. पण फोटो आधीच व्हायरल झाल्यामुळे विराटवर टीका झाली.
चाहत्यांना आवडले नाही फोटो
फिटनेसला सर्वाधिक प्राधान्य देणाऱ्या विराटचे हे फोटो चाहत्यांना आवडले नाहीत. त्यामुळे विराटला सोशल नेटवर्किंगवर ट्रोल करण्यात आलं. याप्रकरणाची संवेदनशीलता लक्षात आल्यावर विराटनंही ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. चुकीच्या कारणांमुळे माझे फोटो व्हायरल होत असल्याचं विराट कोहली म्हणाला. तसंच हे प्रकरण नेमकं काय आहे हे लवकरच बाहेर येईल, असं ट्विट विराटनं केलं. मी नेहमीच हेल्थी फूडचा पुरस्कार केला आहे. प्रत्येक व्यक्तीचा स्वत:ची फिटनेस लेव्हल असते. आपल्या शरिरासाठी जे चांगलं असतं तेच तुम्ही केलं पाहिजे, असं विराट म्हणाला. मला घरातलं जेवणच आवडतं. जेव्हा शक्य होतं, तेव्हा मी घरचं जेवणच जेवतो. पण चिप्स माझी कमजोरी आहे. म्हणून तुम्ही मला चिप्स खातना बघितलं आहे. तुम्ही माझ्या तब्येतीची काळजी करता हे मला समजतंय. आता मला फिटनेसची चिंता न करता खाण्यासाठी वेळ मिळाला, असं म्हणत रोहितनं बंगळुरूच्या टीमला बाहेर झाल्याबद्दल टोला मारला. या जाहिरातीमध्येही विराटचे चाहते अशाच प्रकारची तक्रार करताना दिसत आहेत. पण जाहिरातीच्या शेवटी हे चिप्स कसे हेल्थी आहेत हे विराटनं स्पष्ट केलं आहे.
कोहलीनं नाकारल्या जाहिराती
विराट कोहलीनं काही शीतपेयांच्या जाहिराती नाकारल्या आहेत. याआधी विराटनं शीतपेयांच्या जाहिराती केल्या होत्या आणि सोशल मीडियावर फिटनेसचे धडे दिले होते. आता पुन्हा एकदा चिप्सची जाहिरात केल्यामुळे चाहत्यांनी विराटवर निशाणा साधला आहे.