मला का मारतोय...; लाईव्ह सामन्यात जडेजा आणि Virat Kohli यांच्यामध्ये नेमकं काय घडलं?
पहिल्याच दिवशी 263 रन्सवर कांगारूंची टीम ऑल आऊट झाली. दरम्यान या सामन्यामध्ये फिल्डींग करत असताना विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
Virat Kohli: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये 4 टेस्ट सामन्यांची सिरीज सुरु आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border–Gavaskar Trophy) दुसरा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जातोय. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने (Australia team) टॉस जिंकून प्रथम फलंदाजांचा निर्णय घेतला. मात्र पहिल्याच दिवशी 263 रन्सवर कांगारूंची टीम ऑल आऊट झाली. दरम्यान या सामन्यामध्ये फिल्डींग करत असताना विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
Virat Kohli ने दिलं हैराण करणारं रिएक्शन
ऑस्ट्रेलिया टीम फलंदाजी करत असताना 70 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. झालं असं की, जडेला गोलंदाजी करत असताना त्याने ओव्हरचा तिसरा बॉल 88 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने फेकला होता. तर यानंतर त्याने यामध्ये बदल करत 94 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने बॉल टाकला.
जडेजाचा हा बॉल ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या एजला लागून स्लिपला उभ्या असलेल्या विराट कोहलीकडे (Virat Kohli) कडे गेला. या बॉलचा वेग इतका होता ती, किंग कोहली काही सेकंदांसाठी हैराण झाला. ज्यानंतर विराटने इशाऱ्या इशाऱ्याने बोलताना, मला काय मारतोय, मला नाही आऊट करायचंय, फलंदाजाला आऊट करायचं आहे. विराटने दिलेली ही रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
ऑस्ट्रेलिया टीमचा पहिल्याच दिवशी ऑल आऊट
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये देखील कांगारू फलंदाजांच्या नाकीनऊ आणल्या. 263 रन्सवर ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडूंना पव्हेलियनमध्ये पाठवलं. यावेळी मोहम्मद शमीने कहर करत 4 विकेट्स पटकावले. तर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 3-3 विकेट्स काढले. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकाँब यांनी चांगली फलंदाजी केली.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मारनस लाबुस्चगने, स्टीवन स्मिथ, ट्रॅविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स केरी, पॅट कमिंस (कर्णधार), टॉड मर्फी, नॅथन लियोन, मॅथ्यू कुह्नमॅन.
टीम इंडिया प्लेइंग 11
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.