IND vs AUS test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसर्‍या टेस्ट सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) ज्या पद्धतीने आऊट करण्यात आले त्याबाबत वाद निर्माण झाला आहे. कुहनेमनने एलबीडब्ल्यू आऊट करत विराट कोहलीने माघारी पाठवलं. ऑनफिल्ड अंपायर नितीन मेनन यांनी विराट कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट करार दिला. मात्र, ऑनफिल्ड अंपायरच्या या निर्णयाला विरोध करत किंग कोहलीने रिव्ह्यू घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅडवर लागपूर्वी बॉल बॅटला लागला असल्याची खात्री विराट कोहलीला होती. रिप्ले पाहिल्यानंतर बॉल एकाच वेळी बॅट आणि पॅडला स्पर्श करत असल्याचं दिसून आलं. थर्ड अंपायरने विराट कोहलीला ऑनफिल्ड अंपायरप्रमाणे निर्णय देत आऊट दिलं. यानंतर विराट कोहलीला अशाप्रकारे आऊट दिल्यानंतर फॅन्सच्या मनात तो आऊट आहे की नाही अशा प्रश्न निर्माण झाला आहे.


जाणून घेऊया MCC चा निर्णय काय सांगतो?


Marylebone Cricket Club चा 36.2.2 च्या नियमांनुसार, जर बॉल बॅट आणि पॅड या गोघांना एकत्रच लागतो तर अशा स्थितीमध्ये असं मानलं जातं की, बॉल पहिल्यांदा बॅटला लागली आहे. अशा परिस्थितीत फलंदाजाला नॉटआऊट करार दिला जातो. 




Virat Kohli च्या विकेटवरून वाद


थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी दिलेल्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे. टीम इंडियाच्या पहिल्या डावात ही घटना घडली. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुहनेमनच्या एका बॉलवर पहिल्या मैदानी अंपयारने एलबीडब्ल्यू आऊट दिलं. यावेळी विराटने (Virat Kohli) रिव्ह्यू घेतला. त्यावेळेस थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ (Richard Illingworth) यांनी त्याला आऊट घोषित केलं. रिचर्ड इलिंगवर्थ यांनी दिलेल्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे.


डगआऊटमध्ये येऊन कोच राहुल द्रविड यांच्याशी केली चर्चा


आऊट करार दिल्यानंतर रागाच्या भरात विराट कोहली डग आऊटमध्ये पोहोचला. डग आऊटमध्ये परतल्यानंतर तो थेट कोट राहुल द्रविड यांच्याकडे गेला. यावेळी कोहली कोच राहुल द्रविड यांना, तो आऊट नसल्याचं सांगत असताना दिसतंय. दरम्यान कोहलीला ज्या पद्धतीने आऊट दिलं, ते पाहून राहुल द्रविड देखील नाखूश असल्याचं दिसून आलं.