India Squad SL Series Virat Kohli : भारत आणि श्रीलंका  (IND vs SL) यांच्यात तीन सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट टीम (Sri Lanka Cricket Team) नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे टीम इंडियाच्या किंग कोहलीची... (Virat Kohli will take a break from T20 cricket Team India to be announced soon for Ind vs sl marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने (Virat Kohli) वर्ल्ड कप सेमीफायनलनंतर कोणताही टी-ट्वेंटी सामना खेळला नाही. न्यूझीलंड दौऱ्यावर विराटला आराम देण्यात आला होता. तर बांग्लादेशविरुद्ध टी-ट्वेंटी मालिका (T-20 Series) आयोजित देखील करण्यात आली नव्हती. त्यामुळे विराट कोहलीला त्याच्या बॅटिंगची जादू दाखवता आली नाही. अशातच आता विराटचे चाहते चिंतेत असल्याचं पहायला मिळतंय.


टीम इंडियाचा स्टार विराट कोहली टी-ट्वेंटी क्रिकेटमधून ब्रेक (Virat Kohli will take a break from T20 cricket) घेणार आहे. विराट आता वनडे (ODI) आणि कसोटी क्रिकेटवर (Test Cricket) जास्त लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती बीसीसीआयमधील (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितली आहे. त्यामुळे विराट कोहली टी 20 क्रिकेटपासून काही काळ लांब राहणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय.


श्रीलंकेविरूद्धच्या (IND vs SL) मायदेशात होणाऱ्या टी 20 आणि वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा (Team India to be announced soon) होण्याची शक्यता आहे. त्यासाठी विराट उपलब्ध नसल्याची माहिती बीसीसीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता विराट कोहलीची जागा कोणस घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता युवा खेळाडूचं नाव चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय.


आणखी वाचा - AUS vs SA: LIVE सामन्यात गंभीर अपघात, आकाशातून 'ती' गोष्ट थेट खेळाडूला धडकली अन् 'तो' जागीच कोसळला!


दरम्यान, विराटच्या जागेवर भारताचा अंडर 19 टीमचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार यश धुळ (Yash Dhull) याचं नाव चर्चेत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये यश धुळने धुवांधार कामगिरी केली होती. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने भारत ए संघात देखील स्थान मिळवलं. तर त्याने सैय्यद मुश्ताक अली (syed mushtaq ali trophy) मालिकेत देखील धमाकेदार कामगिरी केली होती. त्यामुळे आता त्याला टीम इंडियात (Team India) संधी मिळणार की नाही?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.


पाहा टीम इंडियाचं शेड्यूल -


तारीख                 सामना                जागा


3 जानेवरी            पहिली टी20          मुंबई


5 जानेवरी           दूसरी टी20             पुणे


7 जानेवरी          तीसरी टी20           राजकोट


10 जानेवरी        पहिली वनडे           गुवाहाटी


12 जानेवरी        दूसरी वनडे           कोलकाता


15 जानेवरी        तीसरी वनडे         तिरुवनंतपुरम