Australia vs South Africa, 2nd Test: ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येत आहे. मलिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये (Melbourne Cricket Ground) सुरू झालाय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेची दैना उडवली. ओपनर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David Warner) द्विशतक ठोकत अफ्रिकेच्या गोलंदाजांना पाणी पाजलं. त्यामुळे सामन्यावर आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व असल्याचं पहायला मिळतंय. अशातच सामन्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Watch video Spider cam crashes into anrich nortje during australia vs South africa boxing day test match marathi news)
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्जिया (Anrich Nortje) मैदानात फिल्डिंग चेंज करत असताना लॉग ऑफच्या दिशेने जात होता. त्यावेळी सामन्याच्या प्रेक्षपणासाठी स्पायडर-कॅम (Spider cam) फिरत होते. स्पायडर कॅम आपली बाजू बदलत असताना थेट नॉर्जियाच्या डोक्यावर जाऊन आदळला. दोन ओव्हरच्या मध्ये ही घटना घडली. त्यामुळे ही घटना टीव्हीवर प्रसारित झाली नाही.
सध्या हा घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना होताना दिसत आहे. त्यावेळी जेम्स ब्रेशॉ कॉमेंट्री करत होते. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्जिया शांतपणे त्याच्या जागी जात होता आणि त्यानंतर ही घटना (Spider cam crashes into anrich nortje) घडली, असं जेम्स ब्रेशॉ यावेळी म्हणाले. या घटनेनंतर नॉर्जिया खाली कोसळल्याचं पहायला मिळतंय. मात्र, तो आता ठीक असल्याची माहिती मिळाली आहे.
स्पायडर-कॅमच्या मदतीने सामना लाईव्ह (LIVE) दाखवण्यात येतो. देश विदेशात सामन्याचं प्रसारण होतं. त्यामुळे घर बसल्या सामन्याचा आनंद घेता येतो. अशातच आता खेळाडू या स्पायडर-कॅममुळे दुखापतीग्रस्त होत असतील तर नेमकी चूक कोणाची?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
If Jim Ross commentated Anrich Nortje being smashed by Spidercam pic.twitter.com/qpujB0PW2g
— Ethan (@ethanmeldrum_) December 27, 2022
दरम्यान, बॉक्सिंग डे सामन्यात एक मनोरंजक दृष्य पहायला मिळालं. सामना सुरू असताना रबाडा बॉन्ड्री लाईनजवळ (Kagiso Rabada Mimic) उभा होता. त्यावेळी प्रेक्षकांनी त्याची नक्कल केल्याचं दिसून आलं. रबाडाने (Kagiso Rabada) डावा हात उचलत स्लोमोशनमध्ये झुलू लागला. त्याला पाहून प्रेक्षकांनी देखील त्याची कॉपी केली. प्रेक्षकांचं हे कृत्य पाहून अनेकांना हसू आवरलं नाही.