IND vs AUS, 2nd Test :  दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. फिरोजशाह कोटला मैदान हे विराट कोहली याचे घरचे मैदान आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करु शकतो.(Cricket News)आतापर्यंत हा मोठा विक्रम जगातील सक्रीय कोणत्याही खेळाडूने आपल्या नावावर केलेला नाही. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 52 धावा केल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,000 धावा पूर्ण करणारा तो जगातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकावेल. आतापर्यंत हा महान विक्रम जगातील कोणताही खेळाडू आपल्या नावावर करु शकलेला नाही. (Cricket News in Marathi)


दुसऱ्या कसोटीत या रेकॉर्डसह कोहली इतिहास रचणार ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 52 धावा केल्या तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ही कामगिरी करणारा सचिन तेंडुलकरनंतरचा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरेल. सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली हा विक्रम करणारा पहिला फलंदाज ठरणार आहे. विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 24948 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 34357 धावा केल्या आहेत.  


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू 


1. सचिन तेंडुलकर (भारत) - 34357 धावा


2. कुमार संगकारा (श्रीलंका) - 28016 धावा


3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 27483 धावा


4. महेला जयवर्धने (श्रीलंका)- 25957 धावा


5. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 25534 धावा 


6. विराट कोहली (भारत) - 24948 धावा 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके


1. सचिन तेंडुलकर (भारत) - 100 शतके


2. विराट कोहली (भारत) - 74 शतके


3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 71 शतके


4. कुमार संगकारा (श्रीलंका) - 63 शतके


5. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 62 शतके


6. हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) - 55 शतके


दिल्ली कसोटीत टीम इंडियाचे प्लेइंग 11 खेळाडू


कसोटीसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.