मुंबई : जगभरात असे दिग्गज खेळाडू आहेत ज्याचे चाहते कमी नाहीत. मात्र काही असेही खेळाडू आहेत ज्यांना मैदानात ज्युनियर खेळाडू आपला गुरू मानतात. त्यांना आवडतात पाकिस्तानच्या बॉलरने चक्क विराट कोहली आणि बाबर आझम या दोघांपैकी कोण आवडतं याचं उत्तर दिलं. त्यानंतर जगभरात एकच चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या या खेळाडूनं बाबर आझम आणि विराट कोहलीची तुलना करत कोण आवडतं ते सांगितलं आहे. बाबर आझमने कमी वयात विराट कोहलीचे एकामागे एक रेकॉर्ड मोडले आहेत. आताटी वन डे शतकाचा रेकॉर्ड मोडण्याकडे बाबर आझमची नजर आहे. 


विराट कोहली की बाबर आजम?


आता पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन आफ्रिदीनेही या दोन्ही खेळाडूंबाबत मोठे वक्तव्य केले. शाहीनला विराट आणि बाबरमधील आवडत्या खेळाडूबद्दल विचारलं, या गोलंदाजाने दोन्ही खेळाडूंची नावे घेतली. मला तर दोन्ही खेळाडू खूप आवडतात असं शाहीन म्हणाला. 


जोस बटलरपेक्षा मोहम्मद रिजवान चांगलं खेळतो असंही यावेळी शाहीन बोलताना म्हणाला. तर आयपीएलपेक्षा पीएसएल लीग सर्वोत्तम असल्याचाही त्याने दावा केला. शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत एकदाही आयपीएलची स्पर्धा खेळलेला नाही. असं असताना त्याने आयपीएलवर भाष्य केलं आहे. 


शाहीनला त्याच्या उत्तम कामगिरीसाठी पुरस्कारही देण्यात आले. त्याला मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर 2021 पुरस्कारही मिळाला. त्याने 2021 मध्ये 36 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 78 विकेट्स ङेतल्या आहेत. टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्येही त्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.