पोर्ट एलिजाबेथ : पोर्ट एलिजाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला ७३ रन्सनी हरवलं. याचबरोबर ६ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं ४-१नं विजयी आघाडी घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतानं दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडे सीरिज जिंकली. अजहरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनीला जी कामगिरी करता आली नाही ती कोहलीनं करुन दाखवली.


भारतानं ही सीरिज जिंकली असली तरी पाचव्या वनडेमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या. शिखर धवनची विकेट घेतल्यावर स्लेजिंग करणाऱ्या कागिसो रबाडावर दंडात्मक कारवाई झाली आहे.


रबाडाबरोबरच तरबेज शम्सीनं विराट कोहली बॅटिंग करत असताना त्याचं स्लेजिंग केलं. शम्सीच्या या स्लेजिंगला मग विराटनंही प्रत्युत्तर दिलं. शम्सी बॅटिंगला आला तेव्हा कोहलीनं केलेल्या स्लेजिंगचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विराट कोहलीनं केलेल्या या स्लेजिंगचं रेकॉर्डिंग स्टम्प मायक्रोफोनमध्ये झालं आहे. शम्सी तू चेस्ट पॅड लावला आहेस, असं कोहली म्हणाला. कोहलीची ही रणनिती यशस्वी झाली आणि कुलदीपनं शम्सीला आऊट केलं.


शम्सीनं रोहित शर्माचा ९६ रन्सवर कॅच सोडला. हा कॅच सोडल्यामुळेही शम्सीवर सोशल नेटवर्किंगवरून निशाणा साधण्यात येत आहे.


विराटचं शम्सीला प्रत्युत्तर