ICC On Virat Kohli: ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या गेलेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड (T20 World Cup) कपमध्ये इंग्लंडने भारताचा दारूण पराभव केला आणि भारताचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. या वर्ल्ड कपमधील सर्वात रोमांचक सामना राहिला तो पाकिस्तानविरुद्ध. रोमांचक राहिलेल्या या सामन्याच भारताने पाकिस्तानची नांगी ठेचली. टीम इंडिया स्टार फलंदाज किंग कोहलीने (Virat Kohli) अखेरच्या षटकात आक्रमक फलंदाजी केली आणि टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिला. (Virat Kohlis six against Haris Rauf is the Greatest T20 shot of all time)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक महिन्यांपासून आऊट ऑफ फॉर्ममध्ये असलेला विराटने प्रथम आशिया चषक आणि त्यानंतर या T20 विश्वचषकात चांगली कामगिरी केली. भारताचा संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नसला तरी किंग कोहली या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्यामुळे आयसीसीने (ICC) देखील विराटचं कौतूक केलंय.


आणखी वाचा - MS Dhoni: 'आधी धोनी मग जड्डू' पण गणित काय जमेना, आता 'हा' खेळाडू करणार चेन्नईचं नेतृत्व!



पाकिस्तान विरुद्ध विराटने 82 धावांची आक्रमक खेळी केली. भारत संकटात असताना विराट कोहली धावून आला आणि पाकिस्तानी गोलंदाजांचा घाम फोडला. ज्यावेळी भारताला 8 बॉलमध्ये 28 धावांची गरज होती. त्यावेळी 19 व्या षटकात विराटने 2 बॉलवर 2 षटकार खेचले आणि सामना पालटला. त्यावर आयसीसीने मोठं वक्तव्य केलंय.


पाहा व्हिडीओ -


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


दरम्यान, हरिस राऊफच्या 19 षटकातील (Virat Kohli's six against Haris Rauf) पाचव्या चेंडूवर विराट कोहलीने मारलेला षटकार जबरदस्त होता. पण परिस्थिती लक्षात घेता, तो असाधारण होता आणि कोणत्याही वादविवादाशिवाय असं म्हणता येईल की 'ग्रेटेस्ट सिंगल T20 शॉट ऑफ ऑल टाईम' होता, असं आयसीसीने लिहिलं आहे.