अबब..! कोहलीच्या एका पोस्टची किंमत चक्क ३.२ कोटी रूपये
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाच विराट कोहलीची `ब्रॅण्ड व्हॅल्यू` केवळ मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही तितकीच आहे. विशेषत: सोशल मीडियावरचा `मार्केटेबल प्लेअर` अशी त्याची खास ओळख आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे मिळणाऱ्या उत्त्पन्नात जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंना तो मागे टाकतो.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाच विराट कोहलीची 'ब्रॅण्ड व्हॅल्यू' केवळ मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही तितकीच आहे. विशेषत: सोशल मीडियावरचा 'मार्केटेबल प्लेअर' अशी त्याची खास ओळख आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे मिळणाऱ्या उत्त्पन्नात जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंना तो मागे टाकतो.
'ब्रॅण्ड व्हॅल्यू' असलेला मार्केटेबल प्लेअर'
विराटचा मैदानावरील एक एक फटका संघाला विजयाच्या समीप घेऊन जातो. त्याच प्रमाणे सोशल मीडियावर त्याची एक पोस्ट त्याच्या उत्पन्नात घसघशीत भर टाकते. म्हणूच त्याच्या मैदानावरील कामगिरीसोबतच त्याच्या सोशल मीडियावरील उत्पन्नाचीही दखल फोर्ब्स सारख्या जगविख्यात आणि तितक्याच प्रतिष्ठीत मासिकाला घ्यावी लागते. फोर्ब्सच्या अहवालानुसार विराट हा सोशल मीडियावरील मोठा 'मार्केटेबल प्लेअर' आहे. इतका की, त्याची 'ब्रॅण्ड व्हॅल्यू' ही जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनल मेस्सीपेक्षाही जास्त असल्याचे फोर्ब्स सांगते.
जाहिरात उत्पन्नाचा स्त्रोत...
प्रत्येक वेळी खेळाडू, कलाकार केवळ पैशासाठीच काम करतो, खेळतो असे नाही. पण, त्याची कामगिरीच त्याला इतक्या उंच टप्प्यावर घेऊन जाते की, त्याचे क्षेत्र हे त्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत न राहता, इतर क्षेत्रेही त्याच्या उत्पन्नाची वाटेकरी ठरतात. जाहीरात हे क्षेत्रही कोहलीच्या उत्पादनाचे मुख्य साधन राहिले आहे. सोशल मीडियापैकी एक असलेल्या इन्स्टाग्रामवर कोहलीची कमाई ऐकून तुम्ही चाट पडाल. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रावरच्या एका पोस्टच्या माध्यमातून एखाद्या ब्रॅण्डचे प्रमोशन करताना कोहली चक्क पाच लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच भारतीय रूपयांत ३.२ कोटी रूपये घेतो.
सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह
कोहलीच्या पोस्टवरून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आकडा ऐकून अजिबात दचकू नका. कारण, कोहली सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असतो. इन्स्टाग्रामवर त्याने १५ मिलीयन (१ कोटी ५० लाख) फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. ट्विटरवर त्याच्या फॉलोवर्सची संख्या आहे २० मिलीयन (तब्बल २ कोटी ५० लाख) तर, फेसबुकवरही हा पठ्ठा मागे नाही. फेसबुकवर त्याचे ३६ मिलीयन (३ कोटी ६० लाख) इतके फॉलोअर्स आहेत.
रोनॉल्डो टॉपला
दरम्यान, कोहली इतका प्रचंड कमाई करत असला तरी, त्याची कमाई फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो पेक्षा कमी आहे. रोनाल्डो इन्स्टाग्रामवर ६.४ कोटी रूपये कमावतो.