मुंबई : आयपीएलच्या ११ व्या सीजनमध्ये रविवारी कोलकात्याने बंगळुरुला पराभूत केलं. ६ विकेट्सने कोलकात्याने विजय मिळवला. या पराभवानंतर विराटला आणखी एक धक्का बसला. घरच्या मैदानात पराभव विराटच्या जिव्हारी लागला. पण विराट सोबतच मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला देखील मोठा धक्का बसला आहे. जाणून घ्या काय आहे नेमकं कारण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी झालेल्या २ सामन्यांमध्ये हैदराबादने राजस्थानवर तर दुसऱ्या सामन्यामध्ये कोलकात्याने बंघलुरुवर विजय मिळवला. हैदराबादच्या विजयानंतर रोहित आणि श्रेयस अय्यरला देखील धक्का बसला कारण या विजयामुळे कोलकात्याचे ८ गुण झाले आहेत. हैदराबाद १२ अंकांसह पहिल्या स्थानावर आहे. तर धोनीच्या नेतृत्वात चेन्नई आणि अश्विनच्या नेतृत्वात पंजाबने ५ सामने जिंकत १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. हे ३ संघ जर आता खराब खेळतील तर त्या प्ले ऑफमधून बाहेर होऊन जातील. सध्या हे ३ टीम प्ले ऑफसाठी क्वालिफाय करतांना दिसत आहेत.


कोलकात्याचा विजय झाला नसता तर पॉईंट टेबलमध्ये तीन संघांना ६-६ गुण मिळाले असते. दोन टीम ४ गुणांवर राहिली असती. यामुळे ५ संघामध्ये अंतर खूप कमी झालं असतं. कोणतीही टीम चौथ्या नंबरवर आली असती. पण आता कोलकात्या या आकडेवारीत थोडी पुढे निघून गेली आहे. कोलकात्याने आता ६ पैकी ३ सामने जिंकले तर ते प्ले ऑफ करतील. यानंतर इतर ४ संघासाठी सेमीफायनलचे दरवाजे बंद होऊन जातील. मुंबई, दिल्ली, राजस्थान आणि बंगळुरु यांना आता प्रत्येक सामने सेमीफायनल प्रमाणे खेळावे लागतील.