बंगळूरू : श्रीलंकेविरूद्धच्या टेस्ट सिरीजमधील दुसरा आणि शेवटचा सामना आज बंगळूरमध्ये होणार आहे. दरम्यान या सामन्यात कोणाला संधी मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तर दुसरीकडे एका खेळाडूला संधी देण्याचा विचार रोहित शर्मा करतोय. विराट कोहली कर्णधार असताना टीम इंडियामध्ये या खेळाडूला कधीही संधी मिळाली नाही. मात्र श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार रोहित शर्मा या खेळाडूला नेहमी संधी देण्याच्या प्रयत्नात असतो. हा खेळाडू म्हणजे टीमचा स्टार विकेटकीपर केएस भरत (KS Bharat). भरत हा अतिशय उत्तम आणि हुशार खेळाडू आहे. अवघ्या काही वेळात तो सामन्याचं संपूर्ण चित्र बदलू शकतो. केएस भरतच्या क्षमतेचा उपयोग केला तर त्याचा नक्कीच टीम इंडियाला फायदा होईल असं तज्ज्ञांचं मत आहे.


केएस भरतची आयपीएलची कामगिरी पाहिली तर ती देखील चांगली आहे. भरतने रॉयल चॅलेंजर बंगळुरू टीमकडून अनेक तुफानी खेळी खेळून सर्वांची मनं जिंकली आहेत. IPL 2021 मध्ये त्याने 8 सामन्यात 191 रन्स केले होते.


न्यूझीलंडविरूद्धच्या सिरीजमध्ये भरतचा समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र ज्यावेळी वृद्धीमान साहा दुखापतग्रस्त झाला तेव्हा तो त्याच्या जागी विकेट कीपिंगसाठी भरत मैदानात उतरला होता. विकेट कीपिंगचं कौशल्यही त्याच्याकडे अप्रतिम आहे.