मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज शेवटचा सामना दिल्लीच्या फिरोज शाह कोटला मैदानात रंगणार आहे. हा सामना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास असणार आहे. कारण अनेक दिवसानंतर तो त्याच्या होम ग्राऊंडवर खेळताना दिसणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विराटवर सर्वांचच लक्ष असणार आहे. टीम इंडियाने या मैदानावर पहिला सामना श्रीलंके विरुद्ध १९८२ मध्ये खेळला होता. ज्यामध्ये टीम इंडियांना ६ विकेटने विजय मिळवला होता. पण शेवटच्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २०१७ मध्ये ५ सामन्याच्या वनडे सिरीजमधला दुसरा सामना याच मैदानावर झाला होता. सिरीजमध्ये ०-१ ने पुढे असताना भारताने टॉस जिंकून आधी बॉलिंगचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय भारतासाठी चुकीचा ठरला. न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सनने या सामन्यात ११८ रनची खेळी करत न्यूझीलंडला २४२ रनपर्यंत पोहोचवलं होतं.


न्यूझीलंडने दिलेल्या २४२ रनचं टार्गेट पूर्ण करताना भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा आणि कोहली स्वस्तात माघारी परतले. ४० रनवर भारताच्या २ विकेट गेल्या. केदार जाधव आणि हार्दिक पांड्याने विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची विकेट पडताच भारताचा डाव कोसळला. न्यूझीलंडने हा सामना जिंकत सिरीजमध्ये १-१ ने बरोबरी केली.


ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५ सामन्यांच्या वनडे सिरीजमध्ये दोन्ही ही संघ २-२ ने बरोबरीवर आहेत. त्यामुळे हा सामना रंगतदार होणार आहे. येथे मोठा स्कोर उभा होऊ शकतो असं पिच क्यूरेटर्स यांचं मत आहे. त्यामुळे दिल्लीकरांना आज त्याचा आनंद घेता येणार आहे.