IND vs AUS: सौरव गांगुली Virat kohli चं खच्चीकरण करतोय का? Ganguly म्हणतो...
IND vs AUS, border gavaskar trophy 2023: टी-ट्वेंटी आणि वनडेमध्ये विराटने धुरळा केला असला तरी विराटची बॅट टेस्टमध्ये (Virat Kohli Test) चमकलेली दिसत नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Virat Kohli vs AUS) विराट कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Saurav Ganguly On Virat Kohli: भारत पुढच्या महिन्यात 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी (IND vs AUS) सामन्यांची हायप्रोफाईल टेस्ट मालिका खेळणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान (border gavaskar trophy 2023) पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीला नागपूरमध्ये खेळला जाणार असल्याने आता टीम इंडियाचे फलंदाज नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहेत. अशातच आता पुन्हा फॉर्ममध्ये आलेल्या विराट कोहलीला सौरव गांगुली याने (Saurav Ganguly On Virat Kohli) मोलाचा सल्ला दिला आहे. (Virat will have to improve in Tests Sourav Ganguly challenge for Kohli ahead of India vs Australia border gavaskar trophy 2023)
काय म्हणाला Saurav Ganguly ?
श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्ध विराटने (Virat Kohli) खरंच चांगली फलंदाजी केली आहे. भारतीय संघ त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्याला कसोटी क्रिकेटमध्ये सुधारणा करावी लागेल, असं वक्तव्य सौरव गांगुलीने केलंय. गांगुलीच्या वक्तव्यानंतर सौरव विराटचं मानसिक खच्चीकरण करतोय का?, अशी चर्चा क्रिडाविश्वात होताना दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS Test Series) एक अतिशय महत्त्वाची मालिका येत आहे, जी मला वाटतं की या दोघांसाठी खूप स्पर्धात्मक असेल, मला अपेक्षा आहे की दोन्ही संघ कडवी झुंज देतील. दोन्ही संघ खूप चांगले आहेत आणि हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल खेळण्याची शक्यता असल्याची भविष्यवाणी देखील गांगुलीने यावेळी केली आहे.
दरम्यान, विराट कोहली (Virat Kohli) सध्या जबरदस्त फॉरममध्ये असल्याचं दिसतंय. मागील वर्षाच्या ऑगस्टमध्ये विराटने दमदार कमबॅक केलं. बांग्लादेश आणि श्रीलंकेला धुळ चारत विराटने आतषबाजी केली अन् शानदार शतक (Virat Kohli Century) ठोकलं. टी-ट्वेंटी आणि वनडेमध्ये विराटने धुरळा केला असला तरी विराटची बॅट टेस्टमध्ये (Virat Kohli Test) चमकलेली दिसत नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Virat Kohli vs AUS) विराट कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.