AB de Villiers च्या निवृत्तीवर विराटची भावूक प्रतिक्रिया, म्हणाला...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने जगभरात नाव कमावणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला आहे. शुक्रवार, 19 नोव्हेंबर रोजी, इंडियन प्रीमियर लीगसह जगभरातील लीग खेळणाऱ्या या खेळाडूने आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट घोषित केला. एबी आयपीएल फ्रँचायझी संघात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत होता. यावर त्यांचा कर्णधार विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने जगभरात नाव कमावणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला आहे. शुक्रवार, 19 नोव्हेंबर रोजी, इंडियन प्रीमियर लीगसह जगभरातील लीग खेळणाऱ्या या खेळाडूने आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट घोषित केला. एबी आयपीएल फ्रँचायझी संघात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत होता. यावर त्यांचा कर्णधार विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
2018 मध्ये अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला, दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केले. आता त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबाबत असा निर्णय घेतला की सगळेच गोंधळात पडले आहेत. फिटनेस आणि फॉर्म दोन्हीही या खेळाडूसोबत असूनही त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा कठीण निर्णय घेतला.
आरसीबीचा कर्णधार विराट आपल्या सहकाऱ्याच्या या निर्णयाने हैराण झाला आहे. त्यांनी निवृत्तीची घोषणा हृदयद्रावक असल्याचे वर्णन केले. कर्णधाराने ट्विट करून लिहिले की, 'माझे मन दुखावले आहे, पण मला माहित आहे की तू नेहमीप्रमाणेच हा निर्णय तुझ्या कुटुंबासाठी घेतला आहे. तू माझे हृदय तोडलेस. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो.'
आयपीएलचे सामने प्रसारित करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने त्याला शानदार कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.