Virender Sehwag : कर्णधारपदाचं स्वप्न दाखवून मला थेट टीमबाहेर केलं; सेहवागचा खळबळजनक खुलासा
Virender Sehwag : सेहवाग पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. वीरेंद्र सेहवागने भारतीय क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल ( Greg Chappell ) यांच्यावर आरोप केलाय. कर्णधारपदाचं स्वप्न दाखवून थेट टीम बाहेर काढण्याचा आरोप सेहवागने केला आहे.
Virender Sehwag : टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. अशातच सेहवाग पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. यावेळी सेहवागने त्याच्या टीम इंडियाबद्दल ( Team India ) एक मोठा आणि खळबळजनक खुलासा केला आहे. टीम इंडियाचे माजी कोच ग्रेग चॅपल ( Greg Chappell ) यांच्यावर सेहवागने ( Virender Sehwag ) गंभीर आरोप केलेत. सेहवागच्या या खुलाश्याने क्रिकेट प्रेमींच्या भुवया उंचावल्यात.
वीरेंद्र सेहवागने भारतीय क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल ( Greg Chappell ) यांच्यावर आरोप केलाय. विरेंद्र सेहवागच्या ( Virender Sehwag ) म्हणण्यानुसार, चॅपल टीम इंडियामध्ये आपल्या आवडीच्या खेळाडूंना प्राधान्य देत असत. याशिवाय अनेकदा त्यांची पक्षपाती वृत्ती पाहिली.
काय म्हणाला विरेंद्र सेहवाग?
स्पोर्ट्स नेक्स्टला विरेंद्र सेहवागने ( Virender Sehwag ) मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सेहवाग म्हणाला की, 'टीम इंडियाचे माजी कोच ग्रेग चॅपल यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की, वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) टीम इंडियाचा कर्णधार बनेल. मात्र दोन महिन्यांनी कर्णधारपद तर विसराच मला थेट टीम इंडियातूनच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
सेहवाग पुढे म्हणाला की, "भारताचे कोच असो किंवा परदेशी कोच, यामध्ये प्रत्येकाचे स्वतःचे आवडते असे खेळाडू होते. यामध्ये दुसऱ्या देशाचा कोच आला तर तो भेदभाव करणार नाही, असं खेळाडूंना वाटायचे. मात्र तसं नव्हतं. या प्रशिक्षकांकडेही आवडते खेळाडू आहेत."
ग्रेग चॅपलबद्दल बोलायचं तर त्यांचा कोचिंगचा कार्यकाळ वादांनी भरलेला होता. सौरव गांगुलीसोबत बरेच वाद झाल्याचं प्रसार माझ्यामांद्वारे समोर आलं होतं.
कसं होतं सेहवागचं करियर?
टीम इंडियामध्ये विरेंद्र सेहवागची मुल्तानचा सुलतान अशी ओळख होती. सेहवागने त्याच्या कारकिर्दीत 104 टेस्ट सामन्यांमध्ये 49.34 च्या सरासरीने 8586 रन्स केले आहेत. यामध्ये 23 शतकं आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. यावेळी 319 रन्सची त्याची खेळी सर्वोत्तम होती.
वनडे सामन्यांमध्येही सेहवागचा रेकॉर्ड चांगला आहे. 251 वनडे सामन्यांमध्ये त्याने 8273 रन्स केले होते. यामध्ये 15 शतकं आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. यावेळी 219 रन्सची सर्वोत्तम खेळी विरूची होती. तर विरूने 19 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण 394 रन्स केले होते.