विराटच्या स्ट्राईक रेटवर सहवागचे प्रश्नचिन्ह, अडचणीत येते टीम आरसीबी
रॉयल चॅलेंजर्स बंगलौर टीमचा कॅप्टन विराट कोहली याने सध्या सुरू असलेल्या आयपीएल सिझनमध्ये ३ अर्धशतकं काढली आहेत, पण
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगलौर टीमचा कॅप्टन विराट कोहली याने सध्या सुरू असलेल्या आयपीएल सिझनमध्ये ३ अर्धशतकं काढली आहेत, पण त्याची बॅट अजूनही तशी तळपलेली नाही, जशी त्याची ओळख आहे. विराट कोहली याच्या या खेळावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि ओपनर बॅटसमन वीरेंद्र सहवाग याने अखेर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एवढंच नाही वीरेंद्र सहवाग याने असं देखील म्हटलं आहे. विराटचा हा खेळ टीम आरसीबीला अडचणीत आणतोय.
आयपीएल करिअरमध्ये आतापर्यंत ५ शतकं आणि ३९ अर्धशतकं झळकवणाऱ्या विराट कोहली बद्दल क्रिकबझशी बोलताना वीरेंद्र सहवागने म्हटलं आहे. विराट कोहली याने आपला गिअर लवकर बदलला पाहिजे. गिअर बदलण्यासाठी तो २० ते २५ चेंडू घेतो, आणि नंतर आऊट झाला, तर टीम अडचणीत येते.
वीरेंद्र सहवाग यावर उदाहरण देताना म्हणतो, विराट कोहली दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या लीग सामन्यात आऊट झाला नसता, तर ४० चेंडूत निदान ८० रन्स काढून आरसीबीला सन्मानजनक स्कोअरपर्यंत घेऊन तरी गेला असता. विराट जेव्हा आऊट झाला तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट ११० ते १२० होता. हा स्ट्राईक रेट काही खास मानता येणार नाही, ज्यामुळे नंतर आरसीबी टीमवर दबाव वाढून टीम अडचणीत येते.
विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीमने मागील ४ सामन्यात सतत पराभवाचा सामना केला आहे. टीमला शेवटच्या सामन्यात देखील दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. पण १४ अंकासाठी त्यांनी प्ले ऑफला क्वालिफाईड केलं.
विराट कोहली याच्या आयपीएल करिअरविषयी विचार केला तर, १९१ सामन्यात त्याने ५ हजार ८७२ रन्स केले आहेत. विराटच्या नावावर ५ शतकं आणि ३९ अर्धशतकं आहेत. आयपीएलमध्ये विराटने ५०३ चौकार आणि २०१ षटकार लावले आहेत.