नवी दिल्ली : टीम इंडियात धडाकेबाज बॅटिंग करणाऱ्या वीरेंद्र सेहवागला जगभरातील बॉलर्स घाबरत होते. सेहवागने केलेले रेकॉर्ड्स याची ग्वाही देतात. वन-डे क्रिकेट, टेस्ट मॅच किंवा टी-२० क्रिकेट असो सेहवाग प्रत्येक फॉर्ममध्ये आपला करिश्मा दाखवत असे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेस्ट क्रिकेटमध्ये दोन ट्रिपल सेंच्युरी, वन-डे मध्ये डबल सेंच्युरी हे सेहवागच्या रेकॉर्डचे उदाहरण आहे. वीरेंद्र सेहवागला जेव्हाही संधी मिळत असे तेव्हा त्याने आपल्या बॅटने बॉलर्सला चांगलेच रडवले आहे. मग तो ग्लेन मॅग्रा असो, शोएब अख्तर, डेल स्टेन, ब्रेट ली असो किंवा शेन वॉर्न असो. सर्वच बॉलरची सेहवागने धुलाई केली आहे.


पण, तुम्हाला कदाचित माहिती नसेल की, वर्ल्ड क्रिकेटमध्ये असाही एक बॉलर होता त्याला सेहवाग घाबरत असे. वीरेंद्र सेहवाग याने स्वत: ही गोष्ट मान्य केली आहे.


वीरेंद्र सेहवागने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, श्रीलंकेता महान बॉलर मुथय्या मुरलीधरन याच्यापासून त्याला खूप भीती वाटत असे. मुरलीधरनची बॉलिंग अॅक्शन पाहून तो नेमका कुठला बॉल टाकणार याची कल्पना येत नव्हती.


सेहवागने खुलासा करत म्हटले की, मी मोठ-मोठ्या बॉलर्सचा सामना केला आहे मात्र, मुरलीधरन त्यापेक्षाही खतरनाक होता.


वीरेंद्र सेहवाग भारताचा पहिला बॅट्समन आहे, ज्याने टेस्ट क्रिकेटमध्ये दोन ट्रिपल सेंच्युरी लगावली आहे. पहिल्यांदा त्याने पाकिस्तान विरोधात तर दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेविरोधात लगावली आहे.