मुंबई : ऋषभ पंत यंदाच्या हंगामात आपल्या कामगिरीनं कमी आणि विवादामुळे जास्त चर्चेत आला. दिल्लीने 4 विकेट्सने सामना जिंकला आहे. सध्या तो त्याच्या खराब फॉर्म आणि कर्णधारपदामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. वीरेंद्र सेहवागनं ऋषभ पंतला एक सल्ला दिला आहे. 


पंतवर संतापला सेहवाग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधारपदाचे निर्णय आणि त्याची फलंदाजी दोन्ही गोष्टी यंदाच्या हंगामात प्रभावी ठरताना दिसत नाहीत. दिल्लीला पंतच्या नेतृत्वात पराभवाचा सामना करावा लागत आहे. तर फलंदाजीत त्याचा फ्लॉप शो सुरू आहे. 


पंतला मोठी कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. तरच दिल्ली टीमला त्याचा फायदा नाही. दिल्ली टीम ट्रॉफीपर्यंत पोहोचण्यासाठी पंतला मेहनत घ्यावी लागणार आहे. पंतने धोनीकडून काही गोष्टी शिकायला हव्यात असंही म्हटलं आहे. 


धोनीकडून शिकावी ही गोष्ट


ऋषभ पंतने चांगल्या फॉर्ममध्ये खेळणं दिल्ली टीमसाठी खूप जास्त गरजेचं आहे. मिडल ऑर्डरसाठी पंतच्या धावा खूप गरजेच्या आहेत. धोनीकडून पंतने शिकायला हवं. पंत शेवटच्या ओव्हरमध्ये 20 ते 25 धावा करू शकतो. मात्र त्यासाठी पंतला काम करावं लागेल आणि शेवटपर्यंत टिकून राहावं लागेल. 


ऋषभ पंतचा फ्लॉप शो सुरूच! 


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात ऋषभ पंतची बॅट फार चांगली खेळताना दिसली नाही. 8 सामन्यांमध्ये त्याला फक्त 190 धावा करण्यात यश आलं आहे. यंदाचा हंगाम पंतसाठी काही खास ठरला नाही. त्याची खराब कामगिरी ही दिल्ली टीमची चिंता वाढवणारी आहे. 


दिल्लीने जिंकला सामना 


कोलकाता विरुद्ध सामना दिल्लीने 4 विकेट्सने जिंकला. याचा कोलकाताला मोठा तोटा झाला. कोलकाता टीम प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 146 धावा केल्या. दिल्लीने हे लक्ष्य अवघ्या 19 ओव्हरमध्येच पूर्ण केलं.